संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

बालवाडी, शिवण वर्ग
प्रवेश प्रक्रिया सावंतवाडीत
सावंतवाडी ः येथील कामगार कल्याण केंद्रात यावर्षीची बालवाडी व शिवण वर्ग प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथील जिमखाना मैदान परिसरातील पालिकेच्या इमारतीत हे वर्ग सुरू होणार आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख नम्रता आराबेकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले. त्यात नमूद केले आहे की, येथील कामगार कल्याण केंद्रामार्फत बालवाडी व शिवण वर्गाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिमखाना मैदानावरील नगरपालिकेच्या इमारतीत हे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संचिता सावंत, उमा पांचाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
.................
उपाध्यक्षपदी प्रा. बांदेकर
वेंगुर्ले : ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वेंगुर्ले तालुका शाखा कार्यकारिणी संदर्भात झालेल्या बैठकीत उपाध्यक्षपदी प्रा. आनंद बांदेकर, तर संघटकपदी प्रा. सचिन परुळकर यांची निवड करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही केवळ संघटना नसून, शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी व ग्राहकहित संवर्धनासाठी जीवनव्रताचे कार्य मानलेल्या सदस्यांचा परिवार आहे. ग्राहक हिताचे संरक्षण, ग्राहक संघटन व ग्राहक मार्गदर्शन यासाठी कार्यरत राहण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेचा जास्तीत-जास्त जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले तालुका शाखाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी केले आहे. या संघटनेच्या उर्वरित कार्यकारिणीत सहसंघटकपदी रुपाली पाटील, मोहन मोबारकर, सचिवपदी संजय पाटील, कोषाध्यक्षपदी संजीव वेंगुर्लेकर, सदस्य विश्वास पवार, यज्ञा साळगांवकर, प्रसिद्धी प्रमुखपदी सावळाराम भराडकर यांचा समावेश आहे.
----
एलटीटी-थिविम रेल्वेला मुदतवाढ
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-थिविम-एलटीटी या समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार एलटीटी थिविम (०१०४५) २६, २८, ३० मे तसेच १ व ३ जूनला, तर थिविम-एलटीटी (०१०४६) २७, २९, ३१ मे तसेच २ व ४ जूनला धावणार आहे. एलटीटी-थिविम रात्री १०.१५ वाजता एलटीटी येथून सुटते व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता थिविम येथे पोहोचते. थिविम-एलटीटी दुपारी २.१० वाजता थिविम येथून सुटते व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता एलटीटी येथे पोहोचते.
..................
कासार्डे-फोंडा रस्ता धोकादायक
कणकवली ः कासार्डे-पियाळी-फोंडा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ या रस्त्यावर नूतनीकरणाचे काम गेले दोन महिने सुरू आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी डांबरीकरण, तर काही ठिकाणी फक्त खडीकरण आणि त्यावर माती टाकल्याने सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता दुचाकी आदी छोट्या वाहनांसाठी धोक्याचा बनला आहे. या मार्गावर दररोज शेकडो ट्रक वाळू वाहतूक करतात. रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. छोट्या वाहनचालकांनी वाहने जपून चालवावी व अपघात टाळावेत, असे आवाहन शिवसेना फोंडा युवा विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60835 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top