
राजापूर- कानाचे मशीन बसवण्यासाठी मदतीचे आवाहन
वैद्यकीय मदतीसाठी हँडिकॅप पॅराप्लेजिकचे आवाहन
राजापूर, ता. २३ ः तालुक्यातील कातळी येथील एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाला कानाचे मशीन बसविण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदत मिळाल्यास त्याला मशीन बसवून तो पुढील शालेय शिक्षण घेऊ शकेल. या संदर्भात रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने माहिती घेतली आहे. त्यांनी या संदर्भात मदतीचे आवाहन केले आहे.
सलमान सज्जाद शेख यांची दोन्ही मुलं महोम्मद (वय ८) आणि जोहान (वय ३) दोघेही कर्णबधीर, मूकबधीर आहेत. महोम्मद सलमान शेख याच्या कानावर २०१६ ला सात लाख रुपये खर्च करून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला कानाचे मशीन बसवले. त्यामुळे त्याला ऐकू येऊ लागले. तो शब्दोच्चार करू लागला. सध्या तो तिसरीत सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिकतो. त्याच्या कानाचे मशीन दर पाच वर्षाने बदलावे लागते. मशीन खराब झाल्याने महोम्मदचे शिक्षण थांबण्याची वेळ आली आहे, कारण त्याला मशीनने ऐकून बोलण्याचा सराव आहे. तो पूर्णत: मशीनवर अवलंबून आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे वडील सलमान शेख यांची नोकरी गेली. छोटी-मोठी कामे करून ते उदरनिर्वाह चालवत आहेत. आजोबा आजारी असतात. घरची परिस्थिती हलाखीची आहे. महोम्मदच्या कानाच्या मशीनची किंमत तीन लाख रुपये आहे. मशीन घेणे अत्यावश्यक आहे. याकरिता दानशूर व्यक्तींनी मशीन घेण्यासाठी सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60848 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..