बांदा ग्रामपंचायतीतर्फे कचरा डेपोची पहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा ग्रामपंचायतीतर्फे कचरा डेपोची पहाणी
बांदा ग्रामपंचायतीतर्फे कचरा डेपोची पहाणी

बांदा ग्रामपंचायतीतर्फे कचरा डेपोची पहाणी

sakal_logo
By

23937
बांदा ः कचरा डेपोची पाहणी करताना सरपंच अक्रम खान. सोबत इतर ग्रामपंचायत सदस्य. (छायाचित्र ः निलेश मोरजकर)

बांदा ग्रामपंचायतीतर्फे
कचरा डेपोची पहाणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज बांद्याचे सरपंच व सदस्यांनी कचरा डेपोची पाहणी केली. दरम्यान त्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन करून परिसरातील लोकांना त्रास होणार नाही यासाठी दक्षता घेवू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, बाळू सावंत, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. पवार आदी उपस्थित होते. बांदा शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने शहराला कचऱ्याची समस्या सतावत आहे. बांदा ग्रामपंचायत ही समस्या दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना शहरात ही कचऱ्याची समस्या आणखी गंभीर होणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपोची पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60859 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top