
राजापूर ः राजापूर पालिका प्रशासनाचा ठेकेदारावर नाही अंकुश
राजापूर पालिकाः लोगो
..
-rat23p27.jpg
L23929
ः राजापूर ः मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याशी चर्चा करताना माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे आणि माजी नगरसेवक, ग्रामस्थ.
--------------
ठेकेदारावर अंकुश नसल्याने रस्ता कामे रखडली
अॅड. खलिफे यांचा प्रशासनावर आरोप; मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ः पावसाळा काही दिवसांवर आलेला असताना शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासह छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या जोडरस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे राजापूरकरांवर पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा खड्ड्यामधून प्रवास करण्याची नामुष्की ओढवणार आहे. त्याला नेमका जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना जाब विचारला. प्रशासनाचा ठेकेदारावर अंकुश नसल्याने रस्त्याची कामे रखडल्याचे सांगत त्यांनी या वेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. मात्र, या रस्त्याला लागून असलेल्या जोडरस्त्यांची कामे अद्यापही प्रलंबित आहेत तर, दुसरीकडे जवाहर चौक ते तालिमखाना दरम्यानच्या रस्त्याचे व जलवाहिनीचे काम सुरू केल्याने हा रस्ता एसटी वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी रोडावली असून, जलवाहिनीच्या कामामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज माजी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी नगरसेवक व नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी भोसले यांची भेट घेतली. प्रशासनाचा ठेकेदारांवर अंकुश नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यामंध्ये लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याने पावसाळ्यात रस्त्यात पडणाऱ्या खड्ड्यांवर काय उपाययोजना करणार? असा सवालही त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज मार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्यांची रखडलेली कामे पूर्ण कधी होणार? असा सवालही केला. या वेळी सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर, हनिफ युसुफ काझी, मुमताज काझी, स्नेहा कुवेसकर, परवीन बारगीर, आसिफ मुजावर, मनसेचे अजिम जैतापकर तसेच सतीश बंडबे आदी उपस्थित होते.
----------------------------------
चौकट
रस्ता दबण्याची शक्यता
छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील जोडरस्त्यांची कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण होतील तसेच मुख्य रस्त्यामध्ये खोदाई करण्यात आल्याने रस्ता दबण्याची शक्यता असल्याने डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर करणार आहे; मात्र पावसाळ्यात त्रास होऊ नये, याकरिता खड्डे बुजवण्यात येणार असून, पावसाळ्यात खड्डे पडल्यास तत्काळ सिंमेट अथवा खडी-डांबरच्या साह्याने खड्डे बुजवण्याची तयारी प्रशासनाने ठेवली असल्याची माहिती मुख्याधिकारी भोसले यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60878 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..