
सीमा भागातील मराठी संस्थांसाठी प्रयत्नशिल
23972
बेळगाव ः येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करताना मान्यवर.
सीमा भागातील मराठी
संस्थांसाठी प्रयत्नशिल
वैभव नाईक ः बेळगावात सत्कार
मालवण, ता. २३ : सीमाभागातील मराठी माणसाच्या भावना तीव्र आहेत. या भावनांची कदर करत १ नोव्हेंबरला काळ्या दिनाच्या मुकफेरीला उपस्थित राहणार आहे. सीमा भागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहे, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी बेळगांव येथे दिली.
आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी (ता.२१) बेळगाव येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व सीमावासियांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. नाईक म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या माध्यमातून (कै.) आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट सीमावासीयांना मोफत दाखविला जाणार आहे.’’ बेळगावमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नाईक यांची चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नरेश पाटील, तालुकाप्रमुख सचिन गोरले आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60903 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..