टु ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु ३
टु ३

टु ३

sakal_logo
By

फोटो काल सोडला
..
-rat23p28.jpg
23951
ः साडवली ः गोकुळमध्ये स्नेहसंमेलनात बोलताना अभिजित हेगशेट्ये.
-------------
प्रवेशितांची ६८ वर्षांची माहिती संकलित करणार

हेगशेट्ये यांची माहिती; गोकुळमधील मुली, कुटुंबीयांच्या संपर्कासाठी यंत्रणा
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २३ ः मातृमंदिर संस्थेतर्फे गेल्या ६८ वर्षांतील गोकुळ प्रवेशितांचा पूर्ण डाटा एकत्रित करण्यात येत आहे. आजवरच्या शेकडो मुली आणि त्यांचे कुटुंबीय यांना संपर्क करणारी यंत्रणा संस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. गोकुळ अनाथालयाच्या २०२४ साली हिरक महोत्सवा निमित्ताने मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी दिली. गोकुळमध्ये स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
देवरूख मातृमंदिर संस्थेच्या संस्थपिका हळबे मावशी यांनी अनाथ मुलांना आधार देण्यासाठी १९६४ ला सुरू केलेला ''गोकुळ'' हा महत्वाचा उपक्रम. या गोकुळमध्ये राहून शिक्षण, सुरक्षितता आणि आयुष्याला दिशा मिळालेल्या माजी प्रवेशितांचा दोन दिवसीय स्नेहमेळावा मातृमंदिरच्या जुन्या गोकुळ इमारतीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून ५५ माजी गोकुळवासीय कुटुंबीयांसह या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते. विजय सराटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. आपण ज्या संस्थेत वाढलो, ज्या परिसरात वावरलो व ज्या मित्र-मैत्रिणींबरोबर राहिलो त्या सर्वांना त्याच ठिकाणी भेटणे यासारखा दुसरा आनंद नाही, याच उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. या वेळी गोकूळ माजी प्रवेशितांनी हळबे मावशी, सुमाताई, नारकर भाऊ, नारकरबाई यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. या माहेरवाशिणी म्हणून आलेला माजी प्रवेशितांसोबत त्यांचे पती, मुलेही आली होती. आपल्या आईच्या बालपणाच्या आठवणीने सारेच भावनोत्कट झाले होते.
स्नेहमेळाव्याच्या उद्घाटनाला ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. सुरेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. या दोन दिवसांत जुन्या आठवणींना उजाळा दिला व सोबतच अनाथ मुलांबाबतची नवी शासकीय धोरणे, आवश्यक कागदपत्रे याबाबतही चर्चा केली. या वेळी विजय सराटे, विनय पानवळकर, विलास कोळपे उपस्थित होते.
--------
चौकट
माजी प्रवेशितांकडून मदतीची गरज
मातृमंदिर संस्थेशी गोकुळ माजी प्रवेशिकांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतांना येथून बाहेर जाणाऱ्या आपल्या नोकरी, व्यवसाय व संसारात स्थिर होणाऱ्या आजच्या माजी प्रवेशितांनी आपल्या पुढील मुलींच्या सुरक्षित, आनंददायी जीवनासाठी आणि शिक्षणासाठी काही आर्थिक भार उचलणे महत्वाचे आहे आणि ती त्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61059 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top