संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

आंबेगावात आज
आरोग्य शिबिर
सावंतवाडी ः आंबेगाव येथील (कै.) वासुदेव परब मित्रमंडळ आणि पडवे येथील एस.एस.पी.एम. लाईफ टाईम हॉस्पिटलच्या संयक्त विद्यमाने आंबेगाव-चावडीवाडी येथे उद्या (ता. २५) सकाळी नऊला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिरात हृदयरोग, युरोलॉजी, जनरल सर्जरी, प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोग, नेत्र चिकित्सा, अस्थिरोग आदी सेवा देण्यात येणार आहेत. तसेच इ.सी.जी., बी.एस.एल., नेत्र तपासणी, बोन डीसीज या तपासण्याही होणार आहेत. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी केले आहे.
---
भरत धाऊसकर
चेअरमनपदी
सावंतवाडी ः न्हावेली ग्रामविकास आघाडीतून विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमनपदी भरत धाऊसकर यांची, तर व्हाईस चेअरमनपदी आनंद नाईक निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. आरोदेंकर यांनी काम पाहिले. यावेळी मावळते चेअरमन दत्ताराम हरमलकर, माजी सरपंच मोहन नाईक, संतोष फणसेकर, धोंडू उर्फ दादा परब, रमेश निर्गुण, गोपाळ मांजरेकर, भगवान कालवणकर, सौ. रश्मी निर्गुण, कृष्णा न्हावेलकर, रत्नप्रभा नाईक, श्रीधर केरकर आदी उपस्थित होते.
..............
धोकादायक झाडे
हटवण्याची मागणी
कणकवली ः कळसुली-हळवल-शिरवल मुख्य मार्गावर उभी असलेली आकेशीची धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तातडीने हटविण्याची मागणी होत आहे. हळवल फाटकानजीक तसेच हळवल-रामदासवाडीदरम्यान अशी काही धोकादायक झाडे आहेत. या मार्गावर मोठी रहदारी असते. संबंधित विभागाने लक्ष वेधून पावसाळ्यापूर्वी वाहन चालकांच्या जीवावर बेतणारी झाडे हटवावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांमधून होत आहे.
--
ओटवणेत आज
‘राणा संग्राम’
ओटवणे ः गावठणवाडी युवा आणि ओटवणे ग्रामस्थ हितचिंतकांच्यावतीने येथील श्री देवी सातेरी रवळनाथ मंदिरात दत्तमाऊली दशावतारी नाट्यमंडळाचा ''राणा संग्राम'' हा काल्पनिक दशावातरी नाट्यप्रयोग् आयोजित केला आहे. उद्या (ता. २५) रात्री नऊला नाट्यप्रयोग सादर होणार असून, नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावठणवाडी युवा वर्गाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61067 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top