छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारावेत
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारावेत

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारावेत

sakal_logo
By

24062
कुणकेश्वर ः येथे सपत्नीक दर्शन घेताना रघुजीराजे आंग्रे.

छत्रपती शिवरायांचे विचार अंगिकारावेत

रघुजीराजे आंग्रे ः कान्होजी आंग्रेंच्या नवव्या वंशजांची विजयदुर्गला भेट

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः तालुक्यातील विजयदुर्ग व कोटकामते गावांशी आंग्रे घराण्याची नाळ जोडलेली आहे. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या ठिकाणी येताना जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहत आल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी कोटकामते येथे सांगितले. पराक्रमाची गाथा सांगणारे गडकिल्ले केवळ पर्यटनासाठी, छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यासाठी नकोत, तर त्यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे तालुक्यातील विजयदुर्ग येथील रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वराच्या चांदीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आले होते. यावेळी त्यांनी विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर तसेच कोटकामते येथील कुलदेवता श्री देवी भगवती मंदिरास भेट दिली. यावेळी कोटकामते व विजयदुर्गमध्ये ढोलताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान ते कोटकामते येथे बोलत होते. यावेळी रघुजीराजे यांच्या सोबत भैरवी आंग्रे होत्या. तसेच इनामदार श्री भगवती संस्थान कोटकामतेचे अध्यक्ष गणेश घाडी, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, कोटकामते प्रभारी सरपंच विजय कुडपकर, खुडी सरपंच मनाली मुणगेकर, दहिबाव सरपंच शुभांगी राणे आदी उपस्थित होते. विजयदुर्ग येथून रघुजीराजे यांनी कुणकेश्वरमध्ये जाऊन श्री देव कुणकेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने रघुजीराजे आंग्रे, भैरवी आंग्रे व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
कुणकेश्वरनंतर कोटकामते येथील श्री भगवती देवीचे त्यांनी दर्शन घेतले. कोटकामते येथे ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते या मंदिराचा जीर्णोद्धार त्याकाळी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या हस्ते झाला असल्याचा तेथील शिलालेखात उल्लेख आहे. त्यामुळे रघुजीराजेंच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आंग्रे घराण्याची कुलदेवता असलेल्या देवी भगवतीचे त्यांनी दर्शन घेतले.
---
किल्ल्याच्या संवर्धनाची गरज
देवी भगवती मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असलेल्या शिलालेखाच्या पाटीचे पूजनही रघुजीराजेंच्या हस्ते करण्यात आले. इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामतेच्यावतीने रघुजीराजे आंग्रे यांचा देवी भगवतीची प्रतिमा भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. रघुजीराजे यांनी दिलेल्या व्याख्यानातून विजयदुर्ग व कोटकामते गावाचा इतिहास त्यांनी उलगडला. किल्ल्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61068 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top