लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर यांनी जिंकली सायकल लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर जिंकली सायकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर यांनी जिंकली सायकल
लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर 
 जिंकली सायकल
लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर यांनी जिंकली सायकल लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर जिंकली सायकल

लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर यांनी जिंकली सायकल लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर जिंकली सायकल

sakal_logo
By

rat24p1.jpg
L24046
दापोली ः सायकल स्पर्धेत सहभागी झालेले सायकलस्वार.
---------------
लकी ड्रॉमध्ये शिर्के, घाणेकर
यांनी जिंकली सायकल
दाभोळ ः दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत आयुष शिर्के आणि अवनी घाणेकर यांनी लकी ड्रॉमध्ये सायकल जिंकली
यामध्ये सर्व वयोगटातील २५० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. ही स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सकाळी ६. ३० वा. सुरू झाली. या वेळेला नगराध्यक्षा ममता मोरे, नगरसेविका साधना बोत्रे, दापोली अर्बन बँकचे उपाध्यक्ष संदीप दिवेकर, ज्येष्ठ संचालक सुभाष शेठ मालू, संचालिका संगीता तलाठी, रमा बेलोसे आदी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. नगराध्यक्षा ममता मोरे, सभापती साधना बोत्रे यांच्यासह अनेकांनी या स्पर्धेत सहभाग घेत सायकलपण चालवली. स्पर्धेत खेड, गुहागर, महाड, पुणे, मुंबईहूनही काही स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा मार्ग आझाद मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक, पांगारवाडी जालगाव, लालबाग, आझाद मैदान असा ५ किमीचा होता. स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. लकी ड्रॉ बक्षिसामध्ये दापोली अर्बन बँक पुरस्कृत, श्री सायकल मार्ट यांच्या सौजन्याने २ सायकल देण्यात आल्या. या सायकली आयुष शिर्के आणि अवनी घाणेकर यांनी जिंकल्या. १० सायकल हेल्मेट आणि इतर अनेक बक्षिसे लकी ड्रॉमधून वाटली.
----------------
आसावरी खेडेकर हिचे यश
खेड ः तालुक्यातील भरणेनाक्याची सुकन्या आसावरी खेडेकर हिने जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले असून वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेल्या आसावरीने जाहिरात क्षेत्रात आपले पाय रोवण्यास सुरवात केली आहे. आपल्या सुमधूर आवाजाच्या जोरावर जाहिरात कंपनी जाहिरातीसाठी आवाज घेत आहेत. केवळ एवढ्यावर न थांबता यु ट्यूब चॅनलवरील बातम्यांसाठीदेखील आपला आवाज देत आहे. आसावरीला इलेक्ट्रॉनिक मीडियाची आवड असून सध्या रत्नागिरी येथे पदविका पत्रकारितेचा अभ्यास करत आहे. आपले आई-वडिलांना आदर्श मानत असून, त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले असल्याचे आवर्जून सांगितले.
-------------
स्नेहल यशवंतरावांचा गौरव
देवरूख ः येथील पदवीधर शिक्षिका आणि प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या संचालिका स्नेहल यशवंतराव यांना ''सकाळ'' माध्यम समुहातर्फे आयडॉल्स महाराष्ट्र वूमन इन्स्प्रिनर'' या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात ''सकाळ'' समुहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षिका म्हणून केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि क्रीडाक्षेत्रात त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा या निमित्ताने गौरव करण्यात आला.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61089 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top