
पान दोन मेन-कोल्हापूरच्या ठेकेदारांचे काम सरस
L२४१७०
- मोर्ले पारगड ः रस्त्याचे निकृष्ट मातीकाम
.............
L२४१७१
मोर्ले पारगड ः आमदार दीपक केसरकर यांनी रस्त्याची पाहणी केली.
कोल्हापूरच्या ठेकेदारांचे काम सरस
दीपक केसरकर ः मोर्ले-पारगड रस्त्याची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ ः स्थानिक ठेकेदारांपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांनी केलेले मोर्ले पारगड रस्त्याचे काम उत्कृष्ट आहे, असे मत माजी वित्त व गृह राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी त्या रस्त्याच्या पाहणीनंतर व्यक्त केले. कुंभवडे, इसापूर, पारगड मार्गे जात त्यांनी त्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये, तालुका संघटक गोपाळ गवस आदी होते.
दोन जिल्हे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मोर्ले पारगड रस्त्यासाठी आमदार केसरकर यांनी वित्त व नियोजन मंत्री असताना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. त्यातील जवळपास सहा कोटी रुपये फक्त मातीकामासाठी असल्याचे सांगण्यात आले. चंदगड तालुक्याच्या हद्दीतील रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याचे काम स्थानिक ठेकेदार करत आहेत. तीन ठेकेदार ते काम करत आहेत; पण त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे तुलनेत दिसते, असे मतही व्यक्त झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांनी मातीकाम करताना योग्य रुंदीकरण केले आहे. प्रत्येक वळणावर चांगले काम केले आहे. चढावरील मातीकामाचे गुणोत्तर प्रमाण योग्य राखले आहे. त्यामुळे वळणावर गाड्या वळविताना भेकुर्ली रस्त्याप्रमाणे गाड्या मागेपुढे करण्याची गरज पडणार नाही. चढ सुध्या योग्य पध्दतीने कापल्याने गाड्या कुठलाही त्रास न होता सहजपणे चढू शकणार आहेत. याऊलट परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्ले पारगड रस्ता कामाची आहे.
................
कोट
संबंधितांवर कारवाईचे आदेश द्या
कोट्यवधी रुपये देऊनही स्थानिक ठेकेदारांमुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे मत रस्त्याच्या पाहणीनंतर व्यक्त करण्यात आले. या रस्त्यामुळे ऐतिहासिक पारगड किल्ला गोवा णि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना अंतराने जवळ येणार आहे. भविष्यात पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन रस्त्याचे काम दर्जेदार होणे आवश्यक आहे. आमदार केसरकर यांनी नुसते मत व्यक्त करून थांबू नये, तर त्यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना द्यावेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
................
करोडोचा काळा दगड लंपास
या रस्त्याचे काम करताना एका ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला असलेला खडक रस्त्यासाठी खडी काढतो म्हणून फोडला आणि तयार झालेली खडी अनेक डंपर भरून लंपास केली. प्रत्यक्षात मोर्ले पारगड रस्त्याचे मातीकामच अद्याप अपूर्ण आहे; पण त्याने त्या रस्त्यासाठी म्हणून काढलेली खडी गुपचूप पळविली आणि ठिकठिकाणी साठा करून ठेवली. सध्या तीच खडी तो ठेकेदार सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या आपल्या अन्य कामांवर वापरत आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61206 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..