देवरूख ः रूपेश कदमना सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः रूपेश कदमना सहकार्य
देवरूख ः रूपेश कदमना सहकार्य

देवरूख ः रूपेश कदमना सहकार्य

sakal_logo
By

(टीप- याबातमी शेजारी rat2426.txt- ही बातमी घ्यावी.)
...
देवरूख-मार्लेश्वर रस्ता दुरुस्तीचा वाद ....................लोगो
.....
बाळासाहेबांच्या शिकवणुकीनुसार रूपेश कदमांना सहकार्य

रवींद्र माईन; जिल्हाप्रमुखांनी कंत्राटदार म्हणून कामाला न्याय द्यावा
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २४ ः प्रशासनाच्या दिरंगाईमुळे देवरूख-मार्लेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी जे आंदोलन झाले, त्यामध्ये आम्हीही सक्रिय सहभाग नोंदवला होता. आम्ही स्थानिक आहोत आणि या रस्त्याचे नियमित वापरकर्तेही. त्यामुळे आम्हा लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम भाजपचे रूपेश कदम करत असतील तर बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून त्यांना सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरे ज्या ८० टक्के समाजकारणाविषयी नेहमी सांगायचे ते हेच. बाळासाहेबांच्या शिकवणुकीनुसार आम्ही सर्व शिवसैनिकांनी रूपेश कदम यांना सहकार्य केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिवसैनिक तथा ग्रामपंचायत निवेखुर्दचे माजी सरपंच रवींद्र नारायण माईन यांनी केले.
देवरूख-मार्लेश्वर रस्त्याच्या दुरुस्ती कामाबाबत राजू साळवी यानी केलेल्या मतप्रदर्शनावर टीपण्णी करताना, माईन म्हणाले, आपण आपल्या जि. प. गटाच्या विकासाकडे लक्ष द्या. ओझरे जि. प. गटातील शिवसैनिक आजही तितकाच प्रखर आणि कडवट आहे. आम्ही तत्त्वांवर प्रेम करणारे शिवसैनिक आहोत. पदाधिकाऱ्यांची हुजरेगिरी करायला बाळासाहेबांनी कधीही शिकवले नाही. आपण एकदा ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करा. सोबत आम्हीही येऊ. मग आपणास ज्ञात होईल की, विलास चाळके जिल्हाप्रमुख असले तरीही त्यांनी कंत्राटदार म्हणून घेतलेल्या कामाला अपेक्षित न्याय दिलेला नाही. केवळ रूपेश कदमला विरोध आणि श्रेय मिळू नये, म्हणून काम अचानक बंद केले. १५ दिवस प्रशासनाने टोलवाटोलवी केली. त्यामुळे सत्य आपणहून बाहेर आले; मात्र यामुळे लोक हवालदिल झाले, ही गोष्ट नक्कीच विलास चाळकेंना समजणार नाही. आपण समजू शकाल कारण आपल्यावर आमच्याप्रमाणेच बाळासाहेबांचे संस्कार आहेत.
रूपेश कदम केवळ दुसऱ्‍या पक्षाचे म्हणून टीका करणे योग्य नाही. त्यांची पोटतिडकीने काम करण्याची पद्धत त्यांना राजकारणात नक्कीच पुढे आणेल. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची तळी उचलणे बंद करा. स्थानिकांपैकी कोणीही रूपेश कदम यांचा विरोध केलेला नाही. केवळ राजकारण म्हणून टिप्पणी करणे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नाही. याचे यापुढे भान ठेवावे.
-----
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61235 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top