मालवणात 10 जूनपासून भाजप प्रदेशचे शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात 10 जूनपासून 
भाजप प्रदेशचे शिबिर
मालवणात 10 जूनपासून भाजप प्रदेशचे शिबिर

मालवणात 10 जूनपासून भाजप प्रदेशचे शिबिर

sakal_logo
By

24198
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना उमा खापरे. शेजारी राजन तेली, अशोक सावंत, दादा साईल आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


मालवणात जूनमध्ये भाजपचे शिबिर

उमा खापरे ः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी येणार, १५० महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शक्य

कुडाळ, ता. २४ ः येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेश महिला कार्यकारिणी बैठक व अभ्यास प्रशिक्षण शिबिर १० ते १२ जून दरम्यान होत आहे. या दौऱ्याचा प्रारंभ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर समारोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या राज्य महिलाध्यक्षा उमा खापरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राज्यातील भाजपच्या १५० महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात उमा खापरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या महिला उपाध्यक्षा नीलम गोंधळी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, बंड्या सावंत, आरती पाटील, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजेश पडते, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, अदिती सावंत, लीना पडते, विशाखा कुलकर्णी, मृण्मयी धुरी, प्रज्ञा राणे, मुक्ती परब, साधना माड्ये उपस्थित होते.
खापरे म्हणाल्या, ‘‘भाजप प्रदेश महिला कार्यकारिणी बैठकीचा प्रारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर अभ्यास दौऱ्याचा प्रारंभ ११ जूनला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. समारोप १२ जूनला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार देवयानी फरांदे हे तीन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत. अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पाच सत्रे, दुसऱ्या दिवशी तीन सत्रे तसेच विविध विषयांवर सर्व नेत्यांचे मार्गदर्शन होणार आहे. हा अभ्यास दौरा कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, आमदार नीतेश राणे यांचेही सहकार्य लाभणार आहे. येथील महिलांसाठीच्या प्रकल्पांची तसेच केंद्रीय मंत्री राणे यांच्या खात्याच्यामार्फत असणाऱ्या विविध योजना, उद्योग, व्यवसायाची माहिती देण्यात येणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना महिलांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्याबाबतही उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.’’
.................
चौकट
महिला जिल्हाध्यक्ष अनुपस्थित
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या नाराज आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्या काही कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत; मात्र त्या नाराज नाहीत, असे उमा खापरे व राजन तेली यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61251 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top