रत्नागिरी ः चिपळूणमध्ये पुराचा इशारा देणार भोंगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः चिपळूणमध्ये पुराचा इशारा देणार भोंगे
रत्नागिरी ः चिपळूणमध्ये पुराचा इशारा देणार भोंगे

रत्नागिरी ः चिपळूणमध्ये पुराचा इशारा देणार भोंगे

sakal_logo
By

भोंगे चित्रः 24294
...
चिपळुणात पुराच्या धोक्याचे इशारा देणारे भोंगे

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; जिल्हा प्रशासनाने घेतली खबरदारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः ‘‘गेल्या वर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे हाहाःकार माजला. अतोनात हानी होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. अशा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी आता चिपळूणमध्ये तीन भोंगे (अलार्म सिस्टिम) वाजणार आहेत. पहिला भोंगा पुराचा इशारा, दुसरा धोक्याची पातळी ओलांडणारा आणि तिसरा भोंगा तो परिसर सोडण्याचा असणार आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
गेल्या वर्षी, २२ जुलैला चिपळूणमध्ये महापूर आला. ढगफुटीसदृश्‍य पाऊस पडल्याने काही तासांत शहरामध्ये पूररेषेच्या वर दीड ते दोन फूट पाणी भरले. अचानक भरलेल्या पाण्याने हाहाःकार माजला. अनेकजण घरातच अडकले. त्यात, कोरोना महामारी सुरू असल्याने उपचारांसाठी दाखल असलेले अनेक रुग्णही वाहून गेले. काहींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आपत्कालीन यंत्रणादेखील तेवढी सतर्क नसल्याने मदतकार्यात अनेक अडथळे आले. काही खासगी संस्थांनी पुढाकार घेऊन बचावकार्याला सुरवात केली. प्रशासन, पोलिस दल, स्थानिक, अन्य संस्था आदींच्या सहकार्याने मदतकार्य सुरू झाले. व्यापारी, दुकानदार, अन्य व्यावसायिकांचे यात मोठे नुकसान झाले. अनेक वाहने पाण्याखाली गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले, कागदपत्रे वाहून गेली. या भयानक परिस्थितीतून अजूनही चिपळूणकर सावरलेले नाहीत. यंदाही लवकर आणि चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना आखल्या आहेत. आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. अनेकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
..
चौकट
दुसरा भोंगा धोक्याची पातळी ओलांडणारा...
आता पूररेषेमध्ये येणाऱ्या अनेक रहिवाशांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर पुराची पूर्वकल्पना किंवा सूचना मिळावी, यासाठी भोंगे (अलार्म सिस्टिम) बसवण्यात आले आहेत. पहिला भोंगा पुराचा इशारा, दुसरा भोंगा धोक्याची पातळी ओलांडणारा आणि तिसरा भोंगा परिसर सोडून जाण्याचा असणार आहे. मोठे नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने व्यापारी, व्यावसायिक आदींना विमा काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
..
एक नजर..
पहिला भोंगा पुराचा इशारा
दुसरा भोंगा धोक्याची पातळी ओलांडणारा
तिसरा भोंगा तो परिसर सोडण्याचा असणार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61258 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top