रत्नागिरी ः जैतापूर प्रकल्पस्थळी येणार फ्रान्सची टीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  जैतापूर प्रकल्पस्थळी येणार फ्रान्सची टीम
रत्नागिरी ः जैतापूर प्रकल्पस्थळी येणार फ्रान्सची टीम

रत्नागिरी ः जैतापूर प्रकल्पस्थळी येणार फ्रान्सची टीम

sakal_logo
By

जैतापूर प्रकल्पस्थळी
उद्या येणार फ्रान्सची टीम
---
पाहणी करणार; पोलिसांकडे मागितले संरक्षण
रत्नागिरी, ता. २४ ः जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (ता. २६) फ्रान्सहून एक टीम येणार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबरोबर सहयोगी म्हणून काम करणाऱ्या कंपनीची ही टीम आहे. ‘न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन’कडून याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे. प्रकल्पस्थळाची पाहणी हा या भेटीचा उद्देश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. या भेटीला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संरक्षण मागितले.
फ्रान्सची ही टीम भारतात सफरीसाठी आली आहे. उद्या (ता. २५) ती टीम रत्नागिरीत दाखल होईल. वादात अडकलेल्या या मोठ्या प्रकल्पात सहा ‘न्यूक्लिअर रिअॅक्टर’ बसविण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी राज्यसभेत देण्यात आली होती. त्यामुळे रखडलेला जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून एक हजार ६५० मेगावॉट क्षमतेचे हे सहा ‘न्यूक्लिअर रिअॅक्टर’ उभारल्यास नऊ हजार ९०० मेगावॉट क्षमतेचा हा देशातला सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.
जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे हा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाईल. अर्थात, स्थानिकांनी याला प्रचंड विरोध करीत मोठे आंदोलन उभारले होते. स्थानिकांच्या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने हा लढा अधिक तीव्र झाला. पण, त्यानंतरही गोष्टी हळूहळू पुढे सरकत राहिल्या. सध्या या ठिकाणी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली गेली असून, संरक्षण भिंतही उभारली गेली आहे; पण कामाने मात्र अद्याप अपेक्षित अशी गती घेतलेली नाही.
आता या प्रकल्पाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. फ्रान्सची एक टीम जैतापूर प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येईल. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबरोबर सहयोगी म्हणून काम करणाऱ्या कंपनीची ही टीम उद्या रत्नागिरीत दाखल होणार असून, गुरुवारी प्रकल्पस्थळाला भेट देईल. मात्र, याला विरोध होण्याच्या शक्यतेने त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. त्यामुळे पोलिस संरक्षणात ही टीम पाहणी करेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61259 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top