माणगाव दत्तमंदिरात आजपासून शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगाव दत्तमंदिरात आजपासून 
शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा
माणगाव दत्तमंदिरात आजपासून शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा

माणगाव दत्तमंदिरात आजपासून शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा

sakal_logo
By

24210
माणगाव ः येथील दत्तमंदिर.

माणगाव येथील दत्त मंदिरात
आजपासून विविध कार्यक्रम

शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा

सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. २४ ः येथील श्री दत्त मंदिरात उद्यापासून (ता. २५) श्री दत्त महाराज, श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज आदी मूर्तींचा पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ झाला. यानिमित्त शुक्रवारपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
श्री दत्त मंदिरात उद्या सकाळी गणपती पूजन, पुण्याहवाचन, जलाधिवास, शय्याधिवास धान्याधिवास, मंडप प्रतिष्ठा व शांती होम, सायंकाळी भक्तीसंगीताचा कार्यक्रम, रामकथा, गीत रामायण, गुरुवारी (ता. २६) सकाळी सातला पीठ देवता स्थापना, पूजन, अग्नी देवता स्थापना, वास्तू हवन, नवग्रह हवन, पर्याय हवन, मुख्य देवता हवन, तत्वहोम, सायंकाळी निसर्गातून शिकवण, ‘श्री दत्तगुरुंचे २४ गुरू’ कार्यक्रम, शुक्रवारी (ता. २७) सकाळी सातला मूर्ती प्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठापना श्रीमद् जगतगुरू शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर व श्री. प. प. वल्लभनंद सरस्वती, गाणगापूर, श्री. प. प. वामनानंद सरस्वती औदुंबर यांच्या हस्ते होणार आहे. साडेसातला तत्वकलश उत्सव मूर्ती, श्री दत्त महाराज पादुकांची श्रींच्या जन्मस्थानापासून श्री दत्त मंदिरापर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणूक, तत्वण्य प्राणप्रतिष्ठा महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अतिथी सत्कार, दुपारी साडेबाराला महानैवेद्य, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी साडेचारला प्रथमेश लघाटे (संगमेश्वर) यांचे सुश्राव्य गायन, साडेसातला वंदना घांगुर्डे व सहकारी (चिंचवड पुणे) यांचे शास्त्रीय व सुगम संगीत आदी कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61274 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top