
टु १
भोवडेत बुद्ध जयंती
साखरपा ः मौजे भोवडे येथील बौद्ध जनहित वर्धक मंडळ आणि माता रमाई मंडळ यांच्या संयु्कत विद्यमाने भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाची सुरवात धम्म ध्वजारोहण व बुद्ध पूजापाठ कार्यक्रमाने भोवडे बौद्ध विहारामध्ये करण्यात आली. यानंतर भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची साखरपा ते भोवडे अशी मिरवणूक काढण्यात आली होती. साखरपा येथील प्रबोधनकार मारुती जोशी यांचे व्याख्यान झाले. रात्री स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम झाला. १७ ला सकाळी नियमित बुद्धवंदना, बुद्धपूजा करण्यात आली. यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे चिटणीस सतीश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्फिगो आयकेअर सेंटरच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. याचा सुमारे ९० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. यानंतर महिलांचा स्नेहमेळावा झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61422 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..