संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat25p2
L24284
ः संगमेश्वर ः नारडुवे येथील आरोग्य शिबिरात तपासणी करताना डॉक्टर, दुसऱ्या छायाचित्रात ग्रामस्थांना चटई वाटप करताना मान्यवर.
-------------------
ग्रामस्थांना चटई वाटप व
डोळे तपासणी शिबिर
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, चटईचे वाटप केले. हे शिबिर आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेने व ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा जोगले व उपसरपंच विजय जोगले यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतमार्फत डोळे तपासणी व ७२ ग्रामस्थांना चष्मा वाटप करण्यात आले. तसेच ५५ महिला व पुरुषांना चटईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी ग्रा. पं. सदस्य संजय मुदगल, ग्रा. पं. सदस्या आराध्या जोगले, संध्या मुदगल, ममता मुदगल , गावप्रमुख महादेव मुदगल, सुरेश मुदगल, दिलीप मुदगल आदी उपस्थित होते.
-----------
-ratchl252.jpg
L24281
ः चिपळूण ः वडेरू येथे आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित डॉक्टर व अन्य.
----------------
वडेरू येथे आरोग्य तपासणी शिबिर
चिपळूण ः लाईफकेअर हॉस्पिटल व एकरूप संघ‌टनामधील वाडी वडेरू यांच्या संयुक्त विद्यमाने वडेरू येथे आरोग्य शिबिर झाले. शिबिराला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये ईसीजी, रक्ततपासणी, मोफत औषधवाटप, मोफत नेत्रतपासणी, कॅन्सरची मोफत तपासणी, मोफत आरोग्यविषयक सल्ला व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत सुविधांचे मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तुकाराम कदम, सुशील कदम यांनी सहकार्य केले. यासाठी डॉ. खोब्रागडे, डॉ. प्राची हरवडे, डॉ. सायली निकम, अभिजित सुर्वे व लाईफ केअर हॉस्पिटलमधील सर्व टीम यांनी सहकार्य केले.
---------
---------
तोडणकरवाडीतील रस्त्याचे डांबरीकरण
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत तोडणकरवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करण्यात आली होती. अखेर जिल्हा परिषद सदस्या आरती तोडणकर यांनी जिल्हा नियोजनामध्ये निधी प्राप्त करून दिल्यामुळे अखेर डांबरीकरण करण्यात आले. गावखडी ग्रामपंचायत ते तोडणकरवाडी या दरम्यान रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमधून चालणे मुश्किल बनले होते. या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी सातत्याने होत होती. जिल्हा परिषद सदस्या तोडणकर यांनी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध केला. त्याप्रमाणे रस्त्यावर खडी पसरवण्यात आली; परंतु डांबर उपलब्ध नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम थांबवले होते. त्याचदरम्यान पाऊस पडला होता. परंतु वेळेत डांबर उपलब्ध झाल्यामुळे आता डांबरीकरण झाले आहे. या संदर्भात शिवसेना विभागप्रमुख किरण तोडणकर म्हणाले, पहिल्या टप्प्यातील पहिला डांबरीकरणाचा थर टाकण्यात आला आहे. उर्वरित दोन कोट पाऊस कमी झाल्यावर करण्यात येणार आहे, असे सांगितले.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61447 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top