उमेश राठोड यांना ''आदर्श ग्रामसेवक'' पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेश राठोड यांना ''आदर्श
ग्रामसेवक'' पुरस्कार प्रदान
उमेश राठोड यांना ''आदर्श ग्रामसेवक'' पुरस्कार प्रदान

उमेश राठोड यांना ''आदर्श ग्रामसेवक'' पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

24302
कुडाळ ः आमदार दीपक केसरकरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना उमेश राठोड.


राठोड यांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार

कार्याची दखल; कुडाळातील कृषी प्रदर्शनात गौरव

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी ता. २५ ः एडगाव-खांबाळे गावचे ग्रामसेवक उमेश राठोड यांना जिल्हा परिषदेचा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुडाळ येथे नुकत्याच झालेल्या सिंधू कृषी व पशू-पक्षी मेळाव्यात माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते राठोड यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. राठोड २०१२ मध्ये ग्रामसेवक म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. ऑगस्ट २०१२ पासून जून २०१९ पर्यंत त्यांनी मांगवली आणि उपळे या गावांची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. आठ वर्षांपासून मांगवलीत कार्यरत असलेले श्री. राठोड यांनी ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार उत्तमरित्या हाताळून अनेक पुरस्कारांसह विविध सन्मान गावाला मिळवून दिले. या कालावधीत काही काळ वेंगसर ग्रामपंचायतीचा कारभारही त्यांच्याकडे होता. दोन वर्षांपूर्वी त्यांची एडगाव येथे प्रशासकीय बदली झाली. गेल्या वर्षभरापासून एडगाव ग्रामपंचायतीसह खांबाळे गावाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी आठ वर्षांच्या काळात पर्यावरण विकासरत्न, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम आदी पुरस्कारांसह मांगवली ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन मिळवून दिले आहे. त्याचबरोबर पहिल्याच टप्प्यात ग्रामपंचायतीचा कारभार ‘पेपरलेस’ करून आपल्या कार्यपद्धतीची चुणूक दाखविली. त्यांच्या आदर्शवत प्रशासकीय कारभाराबद्दल जिल्हा परिषदेकडून त्यांना २०१८-१९ या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार २०२० मध्ये जाहीर झाला होता; परंतु कोविड १९ मुळे पुरस्कार वितरण लांबले होते. एडगाव, खांबाळे गावात काम करताना लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक ग्रामस्थांशी सुसंवाद ठेवून विकासकामांना चालना देत आहेत. या पुरस्काराबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61449 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top