नांदगाव सेवा रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगाव सेवा रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित
नांदगाव सेवा रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित

नांदगाव सेवा रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित

sakal_logo
By

24303
कणकवली : नांदगाव येथील सेवा रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरू असल्‍याचे पत्र उपोषणकर्त्यांना देताना प्रांताधिकारी वैशाली राजमाने.

रस्ता खुला करण्याची ग्वाही

नांदगावचे उपोषण स्थगित; वाढीव मोबदल्‍याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ : नांदगाव तिठा येथील एका बाजूच्या सेवा रस्ता मागणीसाठी सुरू असलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले. येथील सेवा रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरू असल्‍याची लेखी ग्‍वाही प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. तेथील जमिनीसाठी वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्‍याची माहिती महामार्ग प्राधिकरणतर्फे देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखाली एका बाजूचा सेवा रस्ता करण्यात आला; मात्र गोवा ते मुंबई या बाजूला सेवा रस्ता न झाल्‍याने वारंवार अपघात होत आहेत. चार दिवसापूर्वी येथील अपघातात एका महिलेचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येऊन आज प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणात माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, सामजिक कार्यकर्ते भाई मोरजकर, असलदे सरपंच पंढरी वायगंणकर, ओटव उपसरपंच राजेश तांबे, विश्वनाथ जाधव, मारुती मोर्ये, नितेश म्हसकर, आशिये माजी सरपंच शंकर गुरव, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायगंणकर, भगवान लोके, माजी सरपंच संजय पाटील, हनुमंत वाळके, कमलेश पाटील, संतोष पुजारे आदी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. उपोषणाला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सरचिटणीस प्रवीण वरुनकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शवला. प्रांत कार्यालयासमोर सकाळी दहापासून हे उपोषण सुरू होते. या उपोषणकर्त्यांची प्रांताधिकारी राजमाने यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्‍या चर्चेत तेथील जमीन मालक नलावडे यांच्याशी बोलणी सुरू आहेत. त्‍यांच्या जागेचा वाढीव मोबदल्‍याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणकडे पाठविला आहे. तसे पत्रही नलावडे यांना देण्यात आले आहे. त्‍यांच्याशी संपर्क साधून नांदगाव येथील सेवा रस्ता खुला करण्याचे प्रयत्‍न सुरू असल्‍याची माहिती प्रांताधिकाऱ्यांनी दिली.
---
उपोषणकर्त्यांना प्रत
येथील जमीन मालकांच्या वाढीव मोबदल्‍याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणने केंद्राकडे पाठवला आहे. त्‍या पत्राची प्रतही उपोषणकर्त्यांना देण्यात आली. प्रांताधिकारी तसेच महामार्ग विभागाकडून लेखी ग्‍वाही मिळाल्‍याने नांदगाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सुरू असलेले उपोषण स्थगित करत असल्‍याची माहिती नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61450 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top