
कणकवली : महिला शिवसेना मागणी
24356
रत्नागिरी : डॉ. नीलम गोऱ्हे यांना निवेदन देताना शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत.
सॅनिटरी नॅपकिनबाबत
पायलट प्रोजेक्ट घ्या
नीलम सावंत : सिंधुदुर्गबाबत गोऱ्हेंना निवेदन
कणकवली, ता. २५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय शाळा, महाविद्यालये, हायस्कूलमधील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत किंवा अल्प किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावेत. त्याबाबतचा पायलट प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात घ्यावा, अशी मागणी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिले. या मागणीबाबत गोऱ्हे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सावंत यांनी दिली. यावेळी उपजिल्हा संघटक मीनल तळगावकर, पूर्वा सावंत, माधवी दळवी आदी उपस्थित होत्या. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या गोऱ्हे यांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला शिवसेनेच्या वतीने सावंत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गात सॅनिटरी नॅपकिनचा पायलट प्रोजेक्ट राबविण्याबाबतची मागणी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61512 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..