चिपळूण ः नालेसफाई अंतिम टप्प्यात गटारांकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः नालेसफाई अंतिम टप्प्यात गटारांकडे लक्ष
चिपळूण ः नालेसफाई अंतिम टप्प्यात गटारांकडे लक्ष

चिपळूण ः नालेसफाई अंतिम टप्प्यात गटारांकडे लक्ष

sakal_logo
By

नालेसफाई अंतिम टप्प्यात, गटारांकडे लक्ष

चिपळूण पालिका; तुंबलेल्या गटारांचा शोध घेण्यासाठी पन्नास कर्मचारी
चिपळूण, ता. २५ ः शहरातील नालेसफाई अंतिम टप्प्यात आली आहे. नाले आणि पऱ्हे यांची स्वच्छता ९५ टक्के झाली आहे. आता शहरातील मुख्य बाजारपेठेतील गटारे स्वच्छ करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक वैभव निवाते यांनी ''सकाळ''ला दिली.
पावसाळा जवळ आल्यामुळे चिपळूण शहरातील गटार आणि नालासफाई तातडीने व्हावी, या मागणीसाठी शहरातील महिला सुरक्षा समितीचे पदाधिकारी पालिकेवर धडकले. चिपळूण बचाव समितीनेही शहरात पुरासंदर्भात पालिकेकडून उपाययोजना केल्या पाहिजेत, या मागणीसाठी बैठक घेतली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दोन्ही सामाजिक संघटनांना पालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर आरोग्य निरीक्षक निवाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील दोन महिन्यांपासून शहरातील गटारे, नाले आणि परिसर स्वच्छ करण्याचे काम चालू आहे. शहरात पहिला पाऊस मुसळधार होतो. त्यामुळे नाले आणि गटारे तुंबतात. या वेळी तसे होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
पालिकेच्या ५० कामगारांची टीम पावसाळ्यात तयार असणार आहे. गटार तुंबल्याबाबत नागरिकांचे फोन आल्यानंतर आमचे कर्मचारी तातडीने जाऊन गटार स्वच्छ करतील. पावसाळा जवळ आल्यामुळे आम्ही आता शहरातील मुख्य गटांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्य बाजारपेठेतील गटारांची स्वच्छता झाल्यानंतर प्रभागांमधील गटारावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. काही ठिकाणी गटारांची उंची कमी-जास्त आहे त्यामुळे पाणी तुंबते. बहादूरशेख नाका परिसरातील अनेक गटारे जीर्ण झाली आहेत, ती नव्याने बांधण्याची गरज आहे. याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे सूचना केली आहे.
....
चौकट
प्लास्टिकचा कचरा गटारात टाकू नये
काही ठिकाणी गटारांमध्ये मातीचा गाळ येऊन गटार तुंबण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणचे गटार स्वच्छ करण्यासाठी आम्ही जेसीबीची मदत घेणार आहोत. नागरिकांनी त्यांचा प्लास्टिकचा कचरा गटारामध्ये टाकू नये. त्यामुळे नाले तुंबतात. याबाबत आमची जनजागृती सुरू आहे. पावसाळ्यात नागरिकांनी सहकार्य केल्यास गटारांचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल. ज्या भागात गटारांमध्ये माती किंवा प्लास्टिक साचले असेल तर नागरिकांनी पालिकेचे संपर्क साधावा. आम्ही तेथील गटार स्वच्छ करून देण्याचा प्रयत्न करू, असेही निवाते यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61528 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top