खेड ः नालेसफाईचे काम युद्धपातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः नालेसफाईचे काम युद्धपातळीवर
खेड ः नालेसफाईचे काम युद्धपातळीवर

खेड ः नालेसफाईचे काम युद्धपातळीवर

sakal_logo
By

-rat25p19.jpg
L24348
ः खेड ः नगर पालिकेकडून जेसीबीच्या साह्याने सुरू असलेली नालेसफाई.
----------------
खेडमध्ये नालेसफाईचे काम युद्धपातळीवर

खेड, ता. २५ ः खेड नगरपालिका पावसाळ्यात उद्भवणाऱ्‍या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक नाल्यांच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या संकटाच्या मदतीसाठी नगर प्रशासनाने विशेष माहिती पुस्तिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. गतवर्षी २१ जुलैला आलेल्या महापुरात मुख्य बाजारपेठ दोन दिवस पुराच्या विळख्यात अडकून व्यापाऱ्‍यांसह नागरिकांची कोट्यवधीची हानी झाली होती. यामुळे नगर प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी एक महिना अगोदर नियोजन सुरू केले आहे.
शहरातील बसस्थानक, वाणीपेठ, महात्मा ज्योतिबा फुले नगर, सम्राट अशोक नगर, संत रोहिदास नगर, क्षेत्रपाल नगर आदी भाग उंचावला आहे. या भागातून नाले शहरातील पूरप्रवण क्षेत्राच्या दिशेने प्रवाहित होतात. पावसाळ्यात यातील अनेक नाल्यांमध्ये सांडपाणी तुबूंन कचरा साचतो. यामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होते तसेच शहरातील भुयारी गटारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. यामुळे जेसीबीच्या साह्याने नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर या कामावर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61529 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top