खेड ः ज्ञानदीपच्या मगदूम यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः  ज्ञानदीपच्या मगदूम यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
खेड ः ज्ञानदीपच्या मगदूम यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

खेड ः ज्ञानदीपच्या मगदूम यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

-rat25p27.jpg
24373
-राजकुमार मगदूम.
------------
ज्ञानदीपच्या मगदूम यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

खेड, ता. २५ ः तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित (कै.) प्रभाकर गजानन कांबळे, ज्ञानदीप विद्यामंदिर व (कै.) राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिरचे प्राचार्य राजकुमार मगदूम यांना एसओएफ ऑलिम्पियार्ड परीक्षेतून उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी जगभरातून ६ लाख ८० हजार जण सहभागी झाले होते. त्यातून केवळ २० जणांची निवड झाली आहे. त्यामध्ये प्राचार्य मगदूम यांचाही समावेश आहे. संस्कृत विषयाचे विशेष अभ्यासक असणाऱ्‍या मगदूम यांनी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. संस्कृत विषयात असंख्य विद्यार्थ्यांना आजवर १०० पैकी १०० गुणही प्राप्त झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालयाचे नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61544 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top