रत्नागिरी ः पाच वर्षात 20 हजार 290 हेक्टर फळबाग लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पाच वर्षात 20 हजार 290 हेक्टर फळबाग लागवड
रत्नागिरी ः पाच वर्षात 20 हजार 290 हेक्टर फळबाग लागवड

रत्नागिरी ः पाच वर्षात 20 हजार 290 हेक्टर फळबाग लागवड

sakal_logo
By

- rat25p30.jpg
L24378
- रत्नागिरी ः मनरेगांतर्गत फळबाग लागवड करताना शेतकरी.
-------------
पाच वर्षात २०,२९० हेक्टरवर फळबाग लागवड

मनरेगा योजना; साडेचार हजार हेक्टरचे उद्दिष्ट, जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः भातशेतीवर अवलंबून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) बळकटी देण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात २० हजार २९० हेक्टर क्षेत्र फळबागांखाली आले आहे. पुढील वर्षासाठी साडेचार हजार हेक्टरचे लक्ष्य कृषी विभागाला देण्यात आले आहे.
जिल्ह्यात मुख्यत्वेकरून कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या साहाय्याने फळबाग लागवड करण्यात येते. मनरेगा अंतर्गत जिल्ह्याची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय अशी आहे. जिल्ह्यात नऊ तालुके आहेत. यात एकूण ग्रामपंचायतींची संख्या ८४६ इतकी आहे. मनरेगाअंतर्गत नोंदणीकृत मजुरांची संख्या ४ लाख ४८ हजार ९२७ इतकी आहे. नोंदणीकृत एकूण घरांची संख्या २ लाख ३६ हजार ८६३ असून, त्यात १ लाख ७६ हजार ३८४ जॉबकार्ड धारक आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्षात सक्रिय जॉबकार्ड धारकांची संख्या ५४ हजार ८४८ आहे आणि सध्या सुरू असणाऱ्‍या कामांवर मजूर उपस्थिती ४ हजार २८२ इतकी आहे. एकूण सुरू कामांची संख्या १ हजार २०३ आहे. सध्या मजुरांना २५६ रुपये प्रतिदिन या दराने मजुरी अदा करण्यात येते. सुरू असलेल्या कामांमध्ये कृषी विभागाची ६४१ कामे चालू आहेत. यावर १ हजार ८३२ मजुरांची उपस्थिती आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत ५१३ आणि सामाजिक वनीकरणाची ४९ कामे सध्या सुरू आहेत. या कामांवर अनुक्रमे २ हजार २०६ आणि २४४ मजुरांची उपस्थिती आहे. मनरेगाअंतर्गत गोठे, फळबाग, घरकूल, विहिरी, गांडूळखत प्रकल्प शोषखड्डे, गाळ उपसा आणि रस्ते आदी कामे घेण्यात येतात. यात जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन फळबागांच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, पुढील वर्षासाठी साडेचार हेक्टरचे लक्ष कृषी विभागाला देण्यात आले आहे. फळबाग लागवडीमध्ये आंब्यापेक्षाही काजूला प्राधान्य दिले जात आहे. साठ टक्के क्षेत्रावर काजूची लागवड झाली आहे.
--------------
चौकट
वर्षनिहाय हेक्टरी लागवड खालीलप्रमाणेः
वर्ष *क्षेत्र (हेक्टर)
* २०१७-१८* ४९८४.१६
* २०१८-१९*५८९३.९१
* २०१९-२०*४१४९.२०
* २०२०-२१*३१३०.९५
* २०२१-२२*२२३२. ६९
..
ग्राफ करावा
..
एक नजर..
नोंदणीकृत मजुरांची संख्याः ४ लाख ४८ हजार ९२७
नोंदणीकृत घरांची संख्याः २ लाख ३६ हजार ८६३
जॉबकार्ड धारकः १ लाख ७६ हजार ३८४
सक्रिय जॉबकार्ड धारकांची संख्याः ५४ हजार ८४८

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61583 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top