दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगाद
दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगाद

दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगाद

sakal_logo
By

दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगाद

आचरेकर, पाटकर ः तारकर्लीतील घटनेबाबत प्रशासन, आमदारांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ ः तारकर्ली येथील काल घडलेल्या दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगाद आहेत. तारकर्लीतील हा प्रकार राज्यकर्त्यांच्या हलगर्जीपणाचा, निष्काळजीपणाचा व नाकर्तेपणाचा, स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचा ढिसाळ कारभाराचा कळस होता. एवढी घटना घडूनही स्थानिक आमदार ग्रामीण रुग्णालयात फिरकलेही नाहीत, अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांनी पत्रकातून केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, तारकर्ली, देवबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आणि वर्दळीचे पर्यटन केंद्र आहे. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा तारकर्ली, देवबागमध्ये वास्तव्यास असतो. तेथील जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटतो. यातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. त्या बदल्यात राज्यकर्ते काय मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतात? याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. एवढे मोठे पर्यटनस्थळ असूनही याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधायुक्त असणे गरजेचे असताना तेथे साध्या प्रथमोपचाराचीही सुविधा नाही. हे मालवण आणि समस्त कोकणवासीयांचे दुर्दैव आहे. त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असले असते तर काल दोन पर्यटकांचा मृत्यू झाला नसता. त्या पर्यटकांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात एक ते दीड तासाचा विलंब झाला. त्यामुळेच या पर्यटकांचा गुदमरून मृत्यू झाला. स्थानिक पातळीवर तत्काळ प्राथमिक उपचार झाले असते तर पर्यटकांचा जीव वाचला असता.
एवढे सगळे होऊनही स्थानिक आमदारांना गांभीर्य नाही. ते घटनास्थळी भेट देऊ शकले नाहीत. परिस्थितीची माहिती घेऊन पर्यटकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करायला त्यांना वेळ नाही. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अन्य जिल्हास्तरीय प्रशासनाने भेट देत चौकशी करून सांत्वन केले. तारकर्ली पर्यटन केंद्राच्या समोरील समुद्रात दरवर्षी अशा घटना घडतात. हा भाग अत्यंत धोकादायक असतानाही त्याठिकाणी जीवरक्षकांची सुविधा, आरोग्याची सुविधाही राज्यकर्ते उपलब्ध करू शकले नाहीत. त्यांना महसूलच्या नावाखाली लाखो रूपये गोळा करता येतात; परंतु पर्यटकांना तातडीने सुविधा देता येत नाहीत हे दुर्दैव आहे, अशी टीकाही आचरेकर, पाटकर यांनी केली आहे.
-------------
चौकट
ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सुविधा
ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुर्‍या सुविधेमुळे बर्‍याच जणांना खासगी हॉस्पीटलमध्ये हलवावे लागले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटीलेटरची सुविधा नसल्यानेच त्या पर्यटकांना खासगी रुग्णालयात न्यावे लागले. त्यामुळेच त्यांचे प्राण वाचले, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61600 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top