खेड ः मिशन नेत्रा; गुन्हेगारांवर राहणार नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः मिशन नेत्रा; गुन्हेगारांवर राहणार नजर
खेड ः मिशन नेत्रा; गुन्हेगारांवर राहणार नजर

खेड ः मिशन नेत्रा; गुन्हेगारांवर राहणार नजर

sakal_logo
By

-rat25p21.jpg
2L24353
ः खेड ः येथील बसस्थानकासमोर बसवण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा व लाऊडस्पीकर. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा )
----------------------
मिशन नेत्राची नजर गुन्हेगारीवर

खेडमधील वाढ्त्या गुन्‍ह्यांना बसणार आळा; उद्योजक हजवानींचे साह्य, पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः जिल्ह्यातील एक संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खेडच्या प्रगतीआड गुन्हेगार व समाजविघातक तत्त्व येऊ नये या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून मिशन नेत्रा प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे.उद्योजक बशीर हजवानींनी त्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील प्रमुख शहरात मिशन नेत्रांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुन्हेगारीला आळा घालणे, संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियंत्रण साध्य करावयाचे आहे.
जिल्ह्यातील शहराच्या विस्तारामुळे वाहतूक वाढत आहे. पोलिसांचे संख्याबळ कमी आणि दुसरीकडे वाढती गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी हा प्रयत्न आहे. खेड शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याने खेड शहर ''नेत्रा'' च्या कक्षेत आल्याने अप्रिय घटनाना पायबंद बसणार आहे. नेत्राच्या कक्षेमुळे वेळोवेळी नागरिकांना व वाहनचालकांना सूचना देण्यासाठी लाऊडस्पीकरदेखील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याकडून संपूर्ण शहराला नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होत आहे.
बशीर हजवानी फाउंडेशनच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले असून, उमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील रहदारीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही, आणि लाऊड स्पीकरचे नियंत्रण खेड पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्या ठिकाणी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
-----------------------------
चौकट
थेट दंडात्मक कारवाई
शहरात सार्वजनिक ठिकाणी अथवा नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी राहताच त्या गाडीच्या क्रमांकासह त्या वाहनचालकाला बसवण्यात आलेल्या लाऊड स्पीकरच्या माध्यमातून सूचित करण्यात येते. तरीही वाहन न हटवल्यास थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. बसवण्यात आलेले हे कॅमेरे अत्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचे असल्यामुळे परिसरात घडत असलेल्या घटनांवर बारीक नजर ठेवणे सहज शक्य होत आहे.
..
चौकट
सर्वाधिक गुन्हे घडणारे ठिकाण
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे घडणारे ठिकाण म्हणून खेड तालुक्याकडे पाहिले जाते. अपघात, खून, मारामाऱ्या, दरोडे, दंगली, चोऱ्या या घटनांची वाढती आकडेवारी आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार, खेड शहरात प्रोजेक्ट नेत्रा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61609 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top