पान एक-मालवणात साहसी जलक्रीडा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-मालवणात साहसी जलक्रीडा बंद
पान एक-मालवणात साहसी जलक्रीडा बंद

पान एक-मालवणात साहसी जलक्रीडा बंद

sakal_logo
By

टीपः swt2525.jpg
२४४४८.
ओळ - मालवण ः किनारपट्टी आता होणार सुनीसुनी आहे.

मालवणात साहसी जलक्रीडा बंद
३१ ऑगस्टपर्य़त निर्बंध ः हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता.२५ ः जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा आजपासून ३१ ऑगस्टपर्यत बंद करण्याचे आदेश आज मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागातील गजबजलेले पर्यटन सुनेसुने होणार आहे. किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने प्रवासी वाहतूकीसाठी वाढीव मुदत मागितली आहे; मात्र मुदतवाढ देण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी घेतील, असे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यटन हंगामाच्या अंतिम टप्प्यात मंगळवारी (ता.२४) तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंगची बोट उलटून दुर्घटना घडली. या घटनेत दोघांना आपला प्राण गमवावा लागला. परिणामी येथील पर्यटनाला गालबोट लागले. या पार्श्‍वभूमीवर मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन नाईक यांनी आज येथील बंदर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी किल्ला दर्शनास जाणारे तसेच अन्य पर्यटन बोटीवर पर्यटक लाईफ जॅकेट वापर करतात का? याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बंदर निरीक्षक आर. जे. पाटील, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते.
कोरोना नंतरच्या काळात येथील पर्यटन बहरले होते. लाखोंच्या संख्येने येथे दाखल झालेल्या पर्यटकांमुळे तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, मालवण परिसर, तोंडवळी, आचरा परिसर गजबजून गेला होता. पर्यटकांच्या आगमनामुळे कोरोना काळात झालेले आर्थिक नुकसान पर्यटन व्यावसायिकांना काही प्रमाणात भरून काढता आले. गेल्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीत बाजारपेठेत चांगली उलाढालही झाली. आता पर्यटन हंगाम संपत आल्याने अनेक पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या नौका किनार्‍यावर आणण्यास सुरवात केली आहे. २५ मे ते ३१ ऑगस्ट हा पर्यटन व्यवसायाचा बंदी कालावधी आहे. त्यामुळे आजपासून येथील पर्यटन बंद होणार आहे. या बंदी कालावधीत पर्यटन व्यावसायिकांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
आजपासून पर्यटन व्यवसाय बंदी कालावधी सुरू झाला असला तरी पर्यटकांचा ओघ पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने बंदर विभागाकडे किल्ला प्रवासी वाहतूकीसाठी वाढीव मुदत मागितली आहे.

कोट
"किल्ला प्रवासी वाहतूकीसाठी वाढीव मुदतवाढ देण्याचा अधिकार मुंबईतील मेरीटाईम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील."
- सूरज नाईक, कॅप्टन, प्रादेशिक बंदर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61667 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top