
पान एक-ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार
टीपः swt2520.jpg
२४४५१ ओळ - अजय जाधव
ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार
आंबोलीत अपघात ः मृत तरुण वेताळबांबर्डेतील
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी/ आंबोली, ता. 25 ः मोटारसायकलवरील ताबा सुटून ट्रकच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. समीर शशिकांत जाधव (वय 42, रा. वेताळबांबर्डे ता. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. हा अपघात आंबोली घाटात नानापाणी येथील वळणावर मंगळवारी (ता.२४) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ः समीर जाधव हा आपल्या अन्य दोघा मित्रांसोबत रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीहून आंबोली येथे जात होता. समीर हा आपल्या मोटारसायकलवर एकटाच होता तर अन्य दोघे मित्र दुसऱ्या मोटारसायकलने मागोमाग येत होते. याच दरम्यान मुबारक हुसेन शेख (वय ४२, रा. चंदगड) हा आपल्या ट्रकमधून चिरे भरुन मालवण-चौके येथून बेळगावला जात होता. यावेळी अजयने हुसेन यांच्या ट्रकला आंबोली घाटात नानापाणी येथील वळणावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून अचानक चारचाकी वाहन आल्याने अजयचा गाडीवरील ताबा सुटला व तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. यात ट्रकचे मागील चाक अजयच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती ट्रक चालक मुबारक शेख आंबोली पोलिसांना दिली. त्यानंतर हवालदार दत्ता देसाई, सहकारी अभिराज कांबळे, संजय शिंदे यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. जखमी असलेल्या सहकाऱ्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले. यानंतर त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी अपघाताची रितसर पंचनामा करत मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. आज येथील उपजिल्हा रुग्णालयात अजय याच्या मृतदेहाचे विच्छेदन करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोते करीत आहेत.
चौकट
अपघाताच्या भीषणतेमुळे मित्राला धक्का
अजय व त्याच्या सोबत असलेले अन्य दोघे मित्र आंबोलीला एवढा रात्री कशाला जात होते? हे अद्याप उघड झाले नाही; मात्र त्यांच्याकडे महागडे कॅमेरे होते. त्यामुळे ते फोटोग्राफीसाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. त्याचे हे मित्र त्याच्या मागोमागच मोटरसायकलवरुन येत होते. अपघातानंतर त्याच्या मित्रांनी अपघाताची भीषणता पाहिली असता यातील एकाला जोरदार मानसिक धक्का बसला व यात तो अत्यावस्थ झाला. त्याला उपचारासाठी सावंतवाडीत हलविण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61672 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..