टुडे पान एक मेन-सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक मेन-सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती
टुडे पान एक मेन-सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती

टुडे पान एक मेन-सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती

sakal_logo
By

सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती
तिघांच्या जिल्हाबाहेर बदल्या ः प्रमुख पाच तालुक्यांची बीडीओ पदे रिक्त
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः राज्याने २४ मेस राज्यातील ७२ गटविकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गाची पदोन्नती दिली. त्यानंतर त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, यात सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. जिल्ह्यातील चार गटविकास अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यातील तीन अधिकाऱ्यांची जिल्ह्या बाहेर बदली केली आहे. केवळ एका अधिकाऱ्याला जिल्ह्यातच नियुक्ती देण्यात आली आहे; परंतु पदोन्नतीने बदली करून जिल्ह्या बाहेर पाठविलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यात जिल्ह्याला एकही अधिकारी दिलेला नाही. त्यामुळे कणकवली, देवगड पाठोपाठ सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या पंचायत समित्यांची गटविकास अधिकारी पदे रिक्त झाली आहेत.
सध्या राज्य शासन वर्ग अ, वर्ग ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत आहे. २४ मेस राज्यातील ७२ गटविकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गातील पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. सावंतवाडी गटविकास अधिकारी आर. एस. कणसे, कुडाळ गटविकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, वेंगुर्ले गटविकास अधिकारी श्रीमती यु. बी. पाटील (घारगे) यांचा यात समावेश आहे. यातील व्ही. एम. चव्हाण यांना सध्या कार्यरत असलेल्या कुडाळ गटविकास अधिकारी या पदावर पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. आर. एस. कणसे यांना गडचिरोली जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. जे. पी. जाधव यांना रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी, श्रीमती यु. बी. पाटील (घारगे) यांना चिपळूण पंचायत समिती गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, या बदली होऊन परजिल्ह्यात गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर आणखी तीन पदांची भर पडली आहे. परिणामी हा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे द्यावा लागणार आहे.
-------------------
चौकट
ग्रामपंचायत डेप्युटीपदी व्ही. जी. तनपुरे
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांची गेल्या महिन्यात कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रात बदली झाली होती. मात्र, त्यांच्या जागी दुसरे अधिकारी दिला नव्हता. त्याचा पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक ठाकूर यांच्याकडे देण्यात आला होता. राज्यात ७२ गटविकास अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर त्यात समावेश असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी व्ही. जी. तनपुरे यांची नियुक्ती या रिक्त जागी करण्यात आली आहे. तनपुरे हजर झाल्यावर ही रिक्त जागा भरली जाणार आहे.
--------------------
चौकट
पाच पंचायत समित्यांचा
कारभार प्रभारींच्या हाती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुके आहेत. परिणामी जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. यातील कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग या तीन पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी ही पदे भरलेली आहेत. देवगड व कणकवली गटविकास अधिकारी हा पदभार देवगड सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण हे एकटे हाकत आहेत. त्यातच आता मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांची पदोन्नतीने बदली झाल्याने व त्या जागी दुसरे अधिकारी न दिल्याने या तिन्ही जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे गटविकास अधिकारी रिक्त असलेल्या पाच पंचायत समित्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील वेंगुर्ले वगळता उर्वरित सावंतवाडी, कणकवली, मालवण व देवगड या जास्त ग्रामपंचायती असलेल्या पंचायत समित्या आहेत. त्यामुळे येथे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी असणे गरजेचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61784 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top