रत्नागिरी- रिफायनरी सुरू होताना कोकणी तरूण हवा प्रशिक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रिफायनरी सुरू होताना कोकणी तरूण हवा प्रशिक्षित
रत्नागिरी- रिफायनरी सुरू होताना कोकणी तरूण हवा प्रशिक्षित

रत्नागिरी- रिफायनरी सुरू होताना कोकणी तरूण हवा प्रशिक्षित

sakal_logo
By

rat26p7.jpg
L24559
ः भुवनेश्वर ः येथील स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची इमारत पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात संगणकावर शिक्षण घेताना विद्यार्थी.
....
रिफायनरी सुरू होताना कोकणी तरूण हवा प्रशिक्षित

अॅड.पाटणे; स्किल डेव्हलमेंट इन्स्टिट्यूटची गरज, भुवनेश्वरचे उत्तम मॉडेल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प आता होणार, हे सर्वच पक्षांनी मान्य केले आहे. फक्त हा प्रकल्प श्रेयवादात अडकता कामा नये, ही प्रामाणिक अपेक्षा आहे. सर्व संबंधितांनी सकारात्मक भूमिकेतून या प्रकल्पाकडे कोकण विकासाची सुवर्णसंधी म्हणून पाहिले पाहिजे. रिफायनरी प्रकल्पासाठी मनुष्यबळ निर्मितीसाठी भुवनेश्वर (ओरिसा) येथील केंद्र सरकारच्या जागतिक स्तरावरच्या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर राजापूर किंवा रत्नागिरीमध्ये तातडीने अशी इन्स्टिट्यूट सुरू व्हावी, अशी मागणी कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी केली आहे.रिफायनरी सुरू होण्याचे वेळी कोकणातील तरुणवर्ग प्रशिक्षित असण्यासाठी असे प्रशिक्षण आवश्यक आहे.
भुवनेश्वर (ओरिसा) येथे केंद्र सरकारचे पेट्रोलियम खाते व सर्व ऑईल कंपन्यांमार्फत जागतिक स्तरावरची स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची साठ एकर जमिनीवर ५०० कोटी खर्च करून ९ मे २०१६ ला स्थापना झाली. या इन्स्टिट्यूटमध्ये मुलींकरिता कॉम्प्युटर डाटा ॲप्लिकेशन कोर्स तसेच फिटर फॅब्रिकेशन कोर्स, इन्स्ट्रुमेंटेमेशन, पाइप फिटर, सोलर पीवी इन्स्ट्रूमेंटेमेशन, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन, इंडस्ट्रियल टेक्निशियन, एलपीजी मेकॅनिक असे सोळा कोर्सेस उपलब्ध आहेत. ६० एकर जमिनीवर ५०० कोटी गुंतवणूक झाल्याने ५० हजार युवकांना प्रशिक्षण उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला आहे. अशाच प्रकारची स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट केंद्र सरकारने तातडीने राजापूर, रत्नागिरीमध्ये सुरू केली पाहिजे.
..
चौकट
स्वप्न रिफायनरीत शोधा..
थोडक्यात रिफायनरी सुरू होण्याचे वेळी कोकणातील तरुणवर्ग प्रशिक्षित होऊन बाहेर पडेल आणि सन्मानाने रिफायनरीच्या नोकरीमध्ये स्थिरावेल, यासारखा आनंद नाही. कोकणातील गावागावांतील तरुण मुंबईत स्थलांतरित होण्याचे दुष्टचक्र थांबेल तो दिवस आता दूर नाही. कोकणातील तरुणांनी आपल्या भविष्याची स्वप्न या रिफायनरीत शोधली पाहिजेत. कोकणातील जबाबदार नेत्यांनी त्यांच्या मागे ताकदीने उभ राहण्याची गरज आहे. विकासाची गंगा राजापुरात नक्की अवतरेल, या विषयी माझ्या मनात शंका नाही, असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.
........
चौकट 1
रिफायनरीचा फायदा
तीन लाख कोटी गुंतवणूकीचा, महाराष्ट्र कर उत्पादन ६५ हजार कोटी, थेट रोजगार पंधरा हजार, बांधकाम काळात एक ते दीड लाख, संलग्न व्यवसायात एक लाख रोजगार उपलब्ध होणारा रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प आहे. यातून विमानतळ, सुसज्ज बंदर, अद्ययावत हॉस्पिटल, आधुनिक शिक्षण, ट्रान्सपोर्ट संधी, हजारो निवासी सदनिका, हॉटेल्ससारख्या पायाभूत सोयी उपलब्ध होतील. मेडिकल, आयटी, देखभाल करमणूक, बांधकाम आदी पूरक शेकडो उद्योग व्यवसाय उपलब्ध होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61811 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top