पान दोन मेन-जिल्ह्यात ''जमीन आरोग्य पत्रिका'' अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन मेन-जिल्ह्यात ''जमीन आरोग्य पत्रिका'' अभियान
पान दोन मेन-जिल्ह्यात ''जमीन आरोग्य पत्रिका'' अभियान

पान दोन मेन-जिल्ह्यात ''जमीन आरोग्य पत्रिका'' अभियान

sakal_logo
By

PNE17N14988

जिल्ह्यात ''जमीन आरोग्य पत्रिका'' अभियान
पी. बी. ओहळ ः ६ हजार ८० माती नमुने तपासणार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ''जमीन आरोग्य पत्रिका अभियान'' राबविण्यात येत असून, याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील आठ गावांची निवड करून प्रत्येक गावातील ९५ नमुने असे मिळून एकूण ६ हजार ८० माती नमुने तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषी साहाय्यकांमार्फत माती नमुने गोळा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा मृद सर्व्हेक्षण, मृद चाचणी अधिकारी पी. बी. ओहळ यांनी दिली.
जमिनीतील आवश्यक घटकांचे प्रमाण ओळखून जमिनीच्या सुपीकता निर्देशानुसार खतांचा संतुलित वापर करता यावा. जमिनीचे आरोग्य सुधारून कस वाढविण्याच्या दृष्टीने माती परीक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेत मातीची तपासणी करून त्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत, हे पाहिले जाते.
२०२१-२२ मध्ये जिल्ह्यात एकूण १ हजार ४१७ माती नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये सर्वसाधारण १ हजार ३३८, सूक्ष्म ५१, विशेष नमुने २०, तर पाणी नमुने ८ तपासण्यात आले. २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील ८ गावे अशी एकूण ६४ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रत्येक गावातील ९५ नमुने अशा प्रकारे एकूण ६ हजार ८० नमुने घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत जिल्हा कृषी सहाय्यकामार्फत नमुने गोळा करण्याचे काम सुरू असून, या ६ हजार ८० माती नमुन्यांची तपासणी करुन संबंधित जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी पी. बी. ओहळ यांनी दिली.
या तपासणीमध्ये माती परीक्षण, सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी, पाणी परीक्षण केले जाते. सर्वसाधारण मृद चाचणीसाठी ३५ रुपये, विशेष मृद चाचणीसाठी २७५ रुपये, सूक्ष्म मृद चाचणीसाठी २०० रुपये, तर पाणी नमुन्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. या तपासणीमध्ये शेतातील मातीचे नमुने घेऊन त्या मातीचा कस आजमावला जातो. जमिनीचे भौतिक गुणधर्म तपासून त्यानुसार खतांच्या वापराबाबत योग्य त्या शिफारसी व उपाययोजना सुचविल्या जातात. त्यामुळे आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. खतांच्या खर्चात बचत होऊन अधिक फायदा होतो. आम्ल-विम्ल व क्षारयुक्त जमिनी सुधारून त्या पिकवाढीस योग्य करता येतात. त्यासाठी माती व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे यावेळी श्री. ओहळ यांनी सांगितले.
.............
नमुना कधी घ्यावा?
खरीप पीक काढल्यानंतर लगेच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत; मात्र मातीचे नमुने घेताना पाण्याच्या पाटाजवळील जागा, जनावरे बसण्याची जागा, खत, कचरा टाकण्याची जागा, बांध व झाडाखालील जागा, दलदलीची जागा, विहिरीजवळील जागा वगळावी. तसेच सिंचनाकरिता ज्या पाण्याचा वापर आपण करतो, त्या पाण्यामध्ये विविध क्षार विरघळलेले असतात. त्यांचे प्रमाण अधिक झाले, तर ते पिकास व जमिनीस अपायकारक होऊ शकतात. पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असल्यास ठिबक संच बंद पडू शकतो. त्यामुळे ठिबक सिंच बसविताना देखील पाणी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.
............
कोट
"शेतातील अनावश्यक रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी तसेच जमिनीची प्रत ओळखून त्यामध्ये सुधारणा करून शेती उत्पन्न वाढविण्यासाठी माती व पाणी परीक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीतील माती व पाणी परीक्षण करून घेणे अत्यावश्यक आहे."
-पी. बी. ओहोळ, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61818 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top