
गुहागर ः आरजीपीपीएल करतेय मत्स्यशेती
rat26p3.jpg
L24499
ः गुहागर ः याच जलतरण तलावात मत्स्यशेती करण्यात आली आहे.
.....
हा फोटो टुडेत आहे
rat26p4.jpg
L24500
ः आरजीपीपीएल मत्स्यशेतीमधील तिलापिया मासा.
...
सुखद काही .............लोगो
.........
आरजीपीपीएल करतेय मत्स्यशेती
तलावात तिलापियाचे उत्पादन; अनेक उपक्रम सुरू
मयूरेश पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २५ ः वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे उत्पादन कंपनीने घेतले आहे. मत्स्यशेतीच्या यशस्वी प्रयोगातील अनुभवाचा उपयोग करून परिसरातील ग्रामस्थांना उत्पन्नाचा नवा स्रोत्र उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी आगामी काळात प्रयत्न करेल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी व्यक्त केला.
गेले दोन महिने आरजीपीपीएलमधील वीज उत्पादन बंद आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याने कंपनीवर स्थानिकांचा, लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतोय. अशा नकारात्मक परिस्थितीतही पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन, संसाधनाचा योग्य वापर यासाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता आग्रही आहेत. या प्रकल्पावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर सामंता यांनी आरजीपीपीएल निवासी वसाहतीमध्ये विविध वृक्षांची लागवड केली. किचन गार्डनसाठी आग्रह धरला. स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसरासाठी सर्वांना प्रेरित केले. आरजीपीपीएल प्रकल्पांतर्गत पर्जन्यजल साठवून (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अधिकतम वापर कंपनीसाठी केला. याच मोहिमेचा भाग म्हणून डिसेंबर २०२१ मध्ये मत्स्यशेतीचा प्रयोगही कंपनीमध्ये करण्यात आला.
कंपनीच्या परिसरातील एक जलतरण तलाव कित्येक वर्ष वापराविना पडून होता. स्थापत्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे त्यांची देखभाल ठेवली जात असे. सामंता यांनी या विभागाला जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग करण्याची विनंती केली. मत्स्यशेतीतज्ञ डॉ. श्रीधर देशमुख यांची या प्रयोगासाठी मदत घेण्यात आली. १ डिसेंबर २०२१ ला तिलापिया जातीच्या माशांचे २ हजार मत्स्यबीज या तलावात सोडण्यात आले. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभागाचे काही कर्मचारी मत्सखाद्य पुरवणे, तलाव स्वच्छ राहील असे पाहणे, तलावातील पाणी बदलणे आदी कामे करत होते. गेल्या सहा महिन्यांत उत्पादनयोग्य माशांची वाढ तलावात झाली आहे. कंपनीतील अनेक अधिकारी, कर्मचारी मत्स्यशेतीचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी या तलावाला भेट देत आहेत.
------------------------------
चौकट
कर्मचारी अनुभवसंपन्न
या प्रयोगाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता म्हणाले की, मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना यापूर्वीच तयार केली आहे. मत्स्यशेतीच्या प्रयोगातून आमचे कर्मचारी अनुभवसंपन्न झाले आहेत. मत्स्यशेती करू इच्छिणाऱ्या गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. याचा फायदा कंपनी परिसरातील गावकऱ्यांनी करून घ्यावा.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61854 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..