संक्षिप्त-3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-3
संक्षिप्त-3

संक्षिप्त-3

sakal_logo
By

पर्यटन व्यावसायिकांची
आज तारकर्लीत सभा
मालवण, ता. २६ ः स्कूबा डायव्हिंग बोट दुर्घटनेमुळे तसेच जिल्ह्यातील सागरी पर्यटन विषयी पर्यटकांच्या सोशल मिडीयावर येत असलेल्या पोस्टमुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाची होत असलेली बदनामी या विषयावर चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांची सभा उद्या (ता. २७) सायंकाळी साडे चार वाजता तारकर्ली येथील मिलिंद झाड यांच्या हॉटेल किनारा येथे आयोजित केली आहे. तारकर्ली पर्यटन संस्था व पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्यावतीने या सभेचे आयोजन केले आहे. या सभेस सर्व पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
-------------

पालकमंत्री सामंत
आज सिंधुदुर्गात
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या (ता.२७) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा असा ः उद्या सकाळी १० वाजता अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत कोविड आजार व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव. दुपारी २.३० वाजता कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी ३ वाजता रविंद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी ६.३० वाजता सावंतवाडी येथून मोटारीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोली, गोवाकडे प्रयाण.
...........

सैनिकांच्या मुलांसाठी
वसतीगृह प्रवेश प्रक्रिया
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी येथे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्व युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व माजी सैनिक अनाथ पाल्य तसेच शिल्लक राहिलेल्या जागांसाठी नागरी पाल्य यांनी १५ जूनपर्यंत आपला प्रवेश निश्चित करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. वसतीगृह प्रवेशासाठी दर सूची पुढीलप्रमाणे आहे. माजी अधिकारी, ऑनररी अधिकारी पाल्य रु. ९०० दरमहा, माजी जेसीओज पाल्य रु. ८०० दरमहा, माजी एनसीओज/शिपाई - रु. ६०० दरमहा, नागरी पाल्य रु. २ हजार २५० दरमहा. तसेच युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा यांचे सर्व पाल्यांना तसेच माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतीगृह प्रवेश मोफत आहे. नागरी पाल्यांसाठीच्या दरात यंदाच्यावर्षी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवेश पुस्तिका संबंधीत वसतीगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
...........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61865 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top