
राजापूर ः ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्ता पूर्ण करण्याचे आव्हान
ओणी-पाचल-अणुस्कुरा ः लोगो
...
at26p13.jpg
L24514
ः राजापूर ः अणुस्कुरा घाटामध्ये रस्त्याचे सुरू असलेले काम.
.......
रस्ते काम पूर्ण करण्याचे आव्हान
१५ टक्केच पूर्ण; ठेकेदारांचा वाद, तांत्रिक मुद्द्यांत रखडले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधी मंजुरीनंतरही ठेकेदारांचा वाद आणि तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकलेल्या तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. घाट परिसरातून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून सद्यःस्थितीमध्ये सुमारे दहा ते पंधरा टक्के काम झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे काम मान्सूनच्या आगमनापूर्वी पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वी उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यासमोर आहे. ते झाले नाही तर पुन्हा एकदा खड्डेमय रस्त्यातून लोकांना प्रवास करावा लागणार आहे.
गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात घाटमाथा परिसराकडे जिल्हाभरातून जाण्यासाठी तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा हा एकमेव मार्ग मोकळा होता. त्यामुळे जिल्ह्याभरातील अवजड वाहतूक या मार्गाने सुरू होती. सातत्याने सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेकवेळा अपघातही झाले. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करावे, अशी मागणी वाहनचालकांसह सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे. त्यासाठी पाचलवासीयांकडून पाचल ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नुकतेच धरणे आंदोलनही छेडण्यात आले होते. पाचल ग्रामविकास मंडळानेही प्रशासनाला निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले होते. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, तांत्रिक वादामध्ये निविदाप्रक्रिया रखडली होती. पावसाळा तोंडावर असतानाही कामाचा आरंभ होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
अणुस्कुरा-पाचल-ओणी या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवरील तांत्रिक वादावर अखेर तोडगा निघाला असून, आजपासून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गत आठवड्यापासून सुरवात झाली आहे. अणुस्कुरा घाटातून कामाला सुरवात झाली असून, पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यावर बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा भर राहिला आहे. कामाच्या आरंभानंतर गेल्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये सुमारे दहा ते पंधरा टक्के काम पूर्ण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
----------------------------------
चौकट
मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज
येत्या काही दिवसांमध्ये पावसाळ्याला सुरवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मान्सूनच्या आरंभापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार आणि बांधकाम विभागासमोर आहे. मात्र, मान्सूनच्या आगमनाचा अंदाज पाहता पावसाळ्यापूर्वी उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण होणे कठीण दिसत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61869 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..