
संगमेश्वर ः आरवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण
rat26p29.jpg
24607
-आरवली ः येथील रेल्वे स्थानक रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले.
.....
आरवली रेल्वे स्थानक रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
कोकण रेल्वेने शब्द पाळला; सुरेश प्रभू यांचा पाठपुरावा
संगमेश्वर, ता. २६ ः आरवली रेल्वे स्थानक रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने दिलेला शब्द पाळला आहे. तालुक्यातील आरवली रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी स्थानिक रिक्षा आणि इतर वाहनधारक तसेच प्रवाशांची मागणी होती. स्थानिक रिक्षा संघटनेने आरवली रेल्वेस्थानक रस्ता दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांना लक्ष घालण्यास सांगितले होते. येडगे यांनी या प्रकरणी २६ ऑक्टोबरला राज्यसभा खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून लक्ष वेधले होते. येडगे यांच्या पत्राचा संदर्भ देत खासदार प्रभू यांनी तातडीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून आरवली रेल्वेस्थानक रस्ता दुरवस्थेबाबत कार्यवाहीची मागणी केली होती. खासदार प्रभू यांच्या पत्रानुसार, वैष्णव यांनी ३० ऑक्टोबर २०२१ ला रेल्वे संचालकांना आरवली रेल्वेस्थानक रस्ता दुरवस्थेबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
आरवली रेल्वेस्थानक रस्ता डांबरीकरण काम व्हावे, म्हणून येडगे यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. या विषयी कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांनी पुढाकार घेतला होता. या प्रकरणी येडगे यांनी को. रे. प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांच्यासोबत सातत्याने संपर्क ठेवला. आरवली रेल्वेस्थानक रस्ता डांबरीकरण काम मे अखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यानी दिले होते. कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांनी दिलेले आश्वासन पाळत आरवली रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण केल्याने स्थानिक वाहतूकदार आणि प्रवाशांची गैरसोय टळली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61881 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..