रत्नागिरी ः रत्नागिरी पालिकेमध्ये येणार नवे चेहरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरी पालिकेमध्ये येणार नवे चेहरे
रत्नागिरी ः रत्नागिरी पालिकेमध्ये येणार नवे चेहरे

रत्नागिरी ः रत्नागिरी पालिकेमध्ये येणार नवे चेहरे

sakal_logo
By

निवडणूक चिन्ह वापरा
...
रत्नागिरी पालिकेमध्ये येणार नवे चेहरे

व्यापाऱ्यांकडून गणेश भिर्गांडे ; सेना,भाजपची गाळणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः रत्नागिरी पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी पाच ते सहाजणांना डच्चू मिळणार असून, काही नवख्याना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष गणेश भिर्गांडे हे अपक्ष म्हणून आपली राजकीय इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग क्र. १० मधून ते लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. कोरोना महामारी असल्याने निवडणूक प्रक्रिया काहीशी लांबणीवर गेली. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले. डिसेंबरला मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासक नियुक्त केला आहे. त्याला आज पाच महिने व्हायला आले. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा जनतेशी थेट असलेला संपर्क काहीसा कामी झाला आहे. लांबलेल्या निवडणुकीमुळे इच्छुकांना या निवडणुकीसाठी पुन्हा सुरवात करावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी अजून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायम असल्याने आणि पावसाळा तोंडावर आल्याने निवडणुका पावसानंतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी पालिकेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते. त्या खालोखाल भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्या होते; मात्र आता शिवसेनेत इच्छुकांची घाऊक गर्दी आहे. एका घरात एकच पद देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे तर सुमार कामगिरीमुळे शिवसेनेतील काही विद्यमानांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजपमध्येही हे लोण असल्याने विद्यमान पाच ते सहा नगरसेवकांना घरी बसावे लागण्याची शक्यता आहे.
--------------------------------------
चौकट
चांगली एकी
व्यापारी महासंघामध्ये शहर आणि परिसरामध्ये चांगली एकी आहे. कोरोना काळात ती अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले. अनेक राजकीय पक्षांना व्यापाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळतो. निवडणुकीत मताधिक्यांमध्ये भर घालणारे हे पाठबळ ठरते; मात्र या वेळी व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग क्र. ९ मधून ते इच्छुक आहेत. या प्रभागाचे विभाजन होऊन १० वा प्रभाग तयार झाला आहे. तेथून ते अपक्ष म्हणून लढणार आहेत. ढमालनिचा पार ते राधाकृष्ण नाक्याच्या डाव्या बाजूने मांडवीपर्यंत हा प्रभाग जातो. या प्रभागामध्ये भाजपचे २ नगरसेवक आहेत. गणेश भिंर्गाडे यांचा संपर्क चांगला असून, स्वच्छ प्रतिमा आहे. त्याचा परिणाम या वेळी दिसण्याची शक्यता आहे.
------------
चौकट-
नगराध्यक्षपदासाठी लॉबिंग
शिवसेनेत नगराध्यक्षपदासाठीही जोरदार लॉबिंग सुरू आहे. अनेकजण त्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रदीप उर्फ बंड्या साळवी, निमेश नायर, राजन शेट्ये, स्मितल पावसकर आदींची नावे चर्चेत आहेत. त्यासाठी अनेकजण पक्षश्रेष्ठींच्या मागे आहेत.
.............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61888 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top