आरवली ः रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरवली ः रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त
आरवली ः रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त

आरवली ः रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त

sakal_logo
By

- rat26p27.jpg
L24605
ः कडवई ः कडवई-चिखली रस्ता दुरुस्ती कामाची सुरवात.
...
कडवई-चिखली रस्ते दुरुस्तीला मुहूर्त

रिक्षा संघटना होती आक्रमक; पोलिसांचेही साह्य
आरवली, ता. २६ ः संगमेश्वर तालुक्यातील कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास गुरूवारपासून सुरवात झाली. दुरुस्तीच्या कामासाठी रिक्षामालक चालक संघटना कडवई-तुरळ-चिखली यांच्यावतीने १९ मे रोजी ठिय्या आंदोलन छेडले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग (देवरूख) यांच्यावतीने २३ मे रोजी काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालढकल होत होती; मात्र यानंतर रिक्षा संघटनेने घेतलेला आक्रमक पवित्रा व पोलिस प्रशासनाने केलेला पाठपुरावा यामुळे अखेर २६ मे पासून रस्ता दुरुस्ती कामास सुरवात केली. या कामी पोलिस प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली.
कडवई-चिखली रस्त्याची गेली तीन वर्षे खड्डे पडून दुरवस्था झाली होती. रस्त्यावरची वाहतूक धोकादायक बनली होती. रिक्षा संघटनेच्यावतीने गेली दोन वर्षे रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून रिक्षा संघटनेने बांधकाम विभागाच्या देवरूख कार्यालयावर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. १९ मे रोजी सर्वच्या सर्व रिक्षा व्यावसायिकांनी बांधकाम खाते देवरूख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते. रिक्षा संघटनेचा दणका व पोलिस प्रशासनाचा रेटा यामुळे आंदोलनकर्त्यांना २३ मे पासून रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचे लेखी आश्वासन सहाय्यक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित केले; मात्र याचवेळी वेळेवर काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा त्याचवेळी दिला होता. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम व पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61905 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top