
rat2615.txt
अपघातात सव्वालाखांचा मुद्देमाल चोरीस
रत्नागिरी ः तालुक्यातील कसोपसडा ते पावसला जाणाऱ्या रस्त्यावर जालना येथील पर्यटकाच्या मोटारीला अपघात झाला; मात्र अपघात झाल्यानंतर जमाव जमा झाला. जमावाच्या या गर्दीतून गाडीच्या सीटवरील १ लाख २१ हजार ६७५ रोख रक्कमेसह दागिने असलेली पर्स गायब झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास कसोपसडा-रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन भगवानराव डोंगरे (वय ४४, रा. निसर्ग गार्डन कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड जालना) हे पावसवरून येत असताना त्यांच्या मोटारीला कसोपसडा रस्त्यावर किरकोळ अपघात झाला. अपघात घडताच जमाव जमा झाला होता. डोंगरे यांची पत्नी व मुले अपघातामुळे घाबरली होती. त्यानंतर ते रत्नागिरीत आले व जेवणखाण करून शहरातील कॉंग्रेस भुवन येथील लॉजला रूम बूक करून तेथे गेले. तेथे गेल्यावर सामानाची तपासणी केली असता, मुदेमालाची चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस हवालदार घोसाळे करत आहेत.
-----
गिम्हवणे-सुतारवाडीतील प्रौढाची आत्महत्या
दाभोळ ः दापोली तालुक्यातील गिम्हवणे सुतारवाडी येथील प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यशवंत बाबू करडे (वय ५८, रा. गिम्हवणे-सुतारवाडी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) दुपारी दीडच्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत करडे हे ३० वर्षांपासून एकटेच घरात राहात होते. त्यांना दारूचे व्यसनही होते. दुपारी त्यांनी दारूच्या नशेत घराच्या दर्शनी दरवाज्याच्या दारकशीला इलेक्ट्रिकची वायर बांधून ती गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी दापोली पोलिस ठाण्यात खबर दिली. दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास कॉन्स्टेबल नलावडे करत आहेत.
-------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61916 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..