कणकवली : शिवसेना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : शिवसेना इशारा
कणकवली : शिवसेना इशारा

कणकवली : शिवसेना इशारा

sakal_logo
By

फोटो : kan२६१.jpg--KOP22L24623
ओसरगाव : येथील टोलनाका कंपनीचे व्यवस्थापक अमोल कळसकर यांच्याशी संदेश पारकर, सतीश सावंत यांनी चर्चा केली.

तर शिवसेना टोल वसूली बंद पाडणार
पारकर, सावंत यांचा इशारा : टोलनाक्‍यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराओ
कणकवली, ता.२६ : सिंधुदुर्गातील सर्व वाहन चालकांना ओसरगाव टोल नाक्‍यावर संपूर्ण टोल माफी मिळायला हवी. तरीही टोल वसूली सुरू झाली तर आम्‍ही ती बंद पाडू, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत यांनी आज दिला.
ओसरगाव येथील टोलनाक्‍यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह तालुकाध्यक्ष शैलेश भोगले, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले आदींसह शिवसेना कार्यकर्त्यांनी घेराओ घातला.
टोल नाक्‍यावरील एमडीके कंपनीचे व्यवस्थापक अमोल कळसकर यांच्याशी पारकर आणि सावंत यांनी चर्चा केली. यावेळी श्री.पारकर यांनी कणकवली शहरातील चौपदरीकरणाची हद्द निश्‍चित झालेली नाही. फुटपाथ, गटाराची कामे अपूर्ण आहेत. गोपुरी आश्रमाकडील एक लेन अजूनही सुरू झालेली नाही. अनधिकृत बांधकामे अजूनही पाडण्यात आलेले नाहीत. ही सर्व कामे पूर्ण झाल्‍याशिवाय टोल वसूली आम्‍ही करू देणार नाही.’ असा इशारा दिला.
महामार्गातील खारेपाटण ते झाराप हा केवळ ७० किलोमीटरचा टप्पा असून महामार्ग दुतर्फा चार तालुके आहेत. तेथील लोकांना सातत्‍याने जिल्‍हा मुख्यालयात ये-जा करावी लागते. त्‍यामुळे जिल्ह्यातील सर्वच वाहनांना पूर्णत: टोलमाफी द्यायला हवी असेही श्री.पारकर म्‍हणाले. तर महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांचे निवाडे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. काही प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही टोलचा कार्यालयासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेचा मोबदला अद्यापही जमीन मालकाला मिळालेला नाही, त्यामुळे ही सर्व कामे जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोल नाका सुरू करून देणार नाही अशी भूमिका सतीश सावंत यांनी मांडली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61924 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top