
पान एक-जिल्ह्यातील 73 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
KOP21K28796-- टुडे एकवर पेस्टेड आहे...
जिल्ह्यातील ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
जिल्हा परिषद : समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील बदल्यांसाठी आयोजित केलेल्या समुपदेशन प्रक्रियेत १५ प्रशासकीय, ४६ विनंती, तर १२ आपसी अशा एकूण ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या या बदलीपात्र कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी पाच वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषदेच्या जिल्हा संकुलात कार्यरत आहेत. अशा बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्याही बदल्या व्हाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे; परंतु राज्याच्या विविध विधीमंडळाच्या समित्या आणि जिल्हा मुख्यालयातील जिल्हा कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता, या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या नव्हत्या. आता राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने कराव्यात, अशा सूचना दिल्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्हा परिषदेमधील शिक्षकांव्यतिरिक्त सर्वच बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.
२५ मेस समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह यात जिल्हा परिषदेतील विविध खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते. या समुपदेशनामध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका वर्ग चार कर्मचारी, केंद्रप्रमुख आदींसह संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बदल्या झालेले विभाग असे
बदल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील विनंती २, आपसी १२, वित्त विभाग प्रशासकीय ४, विनंती १, ग्रामपंचायत विभाग विनंती १३, बांधकाम विभाग विनंती २, जलसंधारण विभाग प्रशासकीय १, महिला व बालकल्याण विभाग प्रशासकीय २, विनंती ३, आरोग्य विभाग विनंती १७, शिक्षण विभाग प्रशासकीय २, विनंती १, पशुसंवर्धन विभाग प्रशासकीय २, विनंती ४, कृषी विभाग विनंती १ अशा १५ प्रशासकीय, ४६ विनंती तर १२ आपसी अशा एकूण ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61936 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..