तरूणींचे मोबाईल कॅमेऱ्याने शुटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरूणींचे मोबाईल कॅमेऱ्याने शुटिंग
तरूणींचे मोबाईल कॅमेऱ्याने शुटिंग

तरूणींचे मोबाईल कॅमेऱ्याने शुटिंग

sakal_logo
By

मोबाईल कॅमेऱ्याने तरूणींचे शुटिंग;
अल्पवयीन तरूणाविरोधात गुन्हा
राजापूर, ता. २६ ःमुंबईहून आपल्या मामाच्या गावी आलेल्या तरूणींचे मोबाईल कॅमेऱ्याने शुटिंग करणाऱ्या अल्पवयीन तरूणाच्या विरोधात राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात काल ता. २५ रोजी हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळ सिंधुदुर्गातील व सध्या नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्यास असणारी तरूणी आपल्या कुटुंबासह आपल्या मामाच्या घरी उन्हाळी सुट्टी राहण्यासाठी आली होती. मामाचे घर साधे असून बाथरूमही कमी उंचीचे कौलारू आहे. काल (ता. २५) सकाळी तरूणीच्या मावशीची मुलगी तसेच बहीण आंघोळीसाठी गेली असता, बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल कॅमेरा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने तत्काळ आरडा ओरड केली असता, कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी पिडीतेच्या मामाच्या घराच्या बाथरूमला लागून असलेल्या घरात जाऊन पाहिले असता, त्या घरात एक तरूण लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर तरूणाचा मोबाईल तपासला असता मोबाईलच्या रिसायकलबिनमध्ये तरूणीचे आंघोळ करताना शुटिंग केलेले आढळून आले. पिडीतेने आरडा ओरड केल्यानंतर तरूणाने व्हीडीओ डिलीट केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. तरूणीने राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर मौळे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61947 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top