घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करणारा कोलगावमधून ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घटस्फोटीत महिलेवर अत्याचार
करणारा कोलगावमधून ताब्यात
घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करणारा कोलगावमधून ताब्यात

घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करणारा कोलगावमधून ताब्यात

sakal_logo
By

महिलेवर अत्याचारप्रकरणी
कोलगावमधून एक जण ताब्यात
मालाडमध्ये तक्रार ः घटस्फोटीतेच्या आर्थिक फसवणुकीचाही गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः लग्नाचे आमिष दाखवून मुंबई-मालाड येथील घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करून तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई-मालाड पोलिसांनी आज सावंतवाडीत दाखल होत, कोलगाव येथील एकास ताब्यात घेतले.
संबंधिताने महिलेकडून आठ लाख रुपये घेतले होते. ही कारवाई मुंबईचे सहायक पोलिस निरीक्षक गजरे यांच्या मार्गदर्शनखालील पथकाने आज दुपारी केली. सुप्रियान डॉन्ट्स असे त्या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर मालाड पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

कोलगाव येथील संशयित सुप्रियान डॉन्ट्स हा काही कामानिमित्त मुंबई-मालाड येथे गेला होता. तेथे त्याची संबंधित महिलेशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघेही तिच्या रूमवर राहण्यास गेले. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने तिच्यावर अत्याचार केले व तिच्याकडून आठ लाख रुपयांची रक्कम घेऊन तिची फसवणूक केली, अशी तक्रार पीडित महिलेने मालाड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून मुंबई-मालाड पोलिस ठाण्यात अत्याचार तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून मालाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक संशयिताच्या शोधासाठी आज सावंतवाडी शहरात दाखल झाले.
सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने संशयिताला पोलिस ठाण्यात बोलावून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक कोरे यांनी दिली. संबंधित युवकाला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61961 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top