टुडे पान एक अँकर-''खेलो इंडीया'' योजना यशस्वी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक अँकर-''खेलो इंडीया'' योजना यशस्वी करा
टुडे पान एक अँकर-''खेलो इंडीया'' योजना यशस्वी करा

टुडे पान एक अँकर-''खेलो इंडीया'' योजना यशस्वी करा

sakal_logo
By

24730
सावंतवाडी : कबड्डीसाठी निवड झालेल्या मुलांसोबत खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस.


‘खेलो इंडीया’तून विद्यार्थी चमकावेत

विनायक राऊत ः क्रीडा विकासासाठी नेहमीच पाठबळ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा क्षेत्रात नावारूपास यावा, इथले खेळाडू ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत चमकावे यासाठी केंद्राची ‘खेलो इंडीया’ ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातही खेळाडूंना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत, लोकप्रतिनिधीं या नात्याने आम्ही नेहमीच पाठीशी राहू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ''खेलो इंडिया'' या योजनेअंतर्गत कबड्डी, ज्युडो व शुटींग या खेळांसाठी सावंतवाडी तालुक्यातून शालेय मुलांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत ही निवड करण्यात आली असून या मुलांना आवश्यक क्रीडा कीट खासदार राऊत व आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस उपस्थित होत्या.
खासदार राऊत म्हणाले, ‘‘केंद्राकडून ‘खेलो इंडिया’ या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. हे टॅलेंट ओळखून त्यांना आवश्यक ते पाठबळ देण्याचे काम केंद्र शासन करत आहे. भविष्यात हे टेंलेट देशाचे नाव जगात नेईल हाच या मागचा उद्देश आहे. राज्याच्या माध्यमातूनही तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; मात्र जिल्ह्याच्या स्तरावर असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलनाची अवस्था दयनीय झाली असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज रत्नागिरीसारख्या जिल्ह्यातून खेळाडू देशपातळीवर चमकत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाही त्यात मागे नाही; मात्र, ज्याप्रमाणे रत्नागिरीत क्रीडा सोयी उपलब्ध आहेत, त्यामानाने येथे सोय नाही. भविष्यात याकडे जातीनिशी लक्ष घाला. क्रीडा क्षेत्रात हा जिल्हा नावारूपास येण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून येथे आवश्यक सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’’ यावेळी निवड झालेल्या मुलांना किटचे वाटप करण्यात आले.
--------------
चौकट
अभ्यासाकडेही लक्ष द्या
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘आज इतर खेळाप्रमाणे कबड्डीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सावंतवाडी शहराला कबड्डीची परपंरा आहे. तालुक्यात चांगले खेळाडू आहेत. आज ज्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे, त्यांना भविष्यात नाव कमावण्याची मोठी संधी आहे. मात्र, खेळाबरोबरच अभ्यासाकडेही तितकेच लक्ष द्या.’’
---
कोट
खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आम्ही मुलांची निवड करत आहोत. त्या मुलांना पुढील चार वर्ष कोच मार्फत योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- विद्या सिरस, क्रीडा अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62063 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top