मंडणगड - हळद लागवडीतून शेतकऱ्यांना प्रगतीची नवी वाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - हळद लागवडीतून शेतकऱ्यांना प्रगतीची नवी वाट
मंडणगड - हळद लागवडीतून शेतकऱ्यांना प्रगतीची नवी वाट

मंडणगड - हळद लागवडीतून शेतकऱ्यांना प्रगतीची नवी वाट

sakal_logo
By

ही बातमी ॲकरला घेवू नये. दुसरी देत आहे

-rat27p3.jpg
L24706
ः मंडणगड ः तालुक्यात विविध भागात पाच एकर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली.
..
-rat27p4.jpg
24707
ः शेताच्या बांधावर जाऊन हळदविषयक मार्गदर्शन देण्यात आले.
---------------
केली हळद लागवड, उत्पन्न गेले साडेसतरा लाखांवर

मंडणगड तालुक्यात प्रयोगशील शेतीचा वस्तूपाठ; पहिल्या वर्षी ७ टन हळद पावडर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः हळद लागवडीचा पथदर्शक प्रकल्प राबवून त्याला योग्य मार्गदर्शन आणि कृतीची जोड देत मंडणगड तालुक्यात हळदीचे उत्पादन घेत प्रयोगशील शेतीचा वस्तूपाठ घालण्यात आला. मंडणगड पंचायत समितीच्या माध्यमातून गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या हळदीपासून ४० टन इतकी कच्ची हळद उत्पादित झाली. यातून ७ टन इतकी हळद पावडर तयार करण्यात आली आहे. यातून तालुक्यातील शेतकऱ्यांना १७ लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती कृषी अधिकारी विशाल जाधव यांनी दिली.
नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या अंर्तगत गतवर्षी तालुक्यात हळद रोपवाटिकेच्या माध्यमातून ५० हजार हळदीची रोपे तयार करण्यात आली होती. या रोपांची तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड करावी याकरिता पंचायत समितीने ग्रामस्तरावर महिला बचतगट व शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यावर्षीही हळद लागवडीचा उपक्रम शेतकरी राबवतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
..
चौकट
सुमारे ५ एकर क्षेत्रावर लागवड
पहिला टप्प्यात हळकुंडापासून ५० हजार हळदीचे रोपे प्रो-ट्रेमध्ये तयार करण्यात आली. सुमारे ५ एकर क्षेत्रावर विविध शेतकऱ्यांच्या शेतात हळद लागवड करून हा पथदर्शक प्रकल्प पंचायत समिती कृषी विभागाकडून राबवण्यात आला. यामध्ये तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूह, प्रगतिशील शेतकरी, बचतगट, शेतीसमूह यांनी सहभाग घेत कृतिशील जोड दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62080 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top