
कृष्णजी केशव दामले तथा केशवसुत
यापूर्वी २१ ता. टु ३ वर लागले आहे सदर
...
(इये साहित्याचिये नगरी...................)
......
rat27p13.jpg
2L24753
ः प्रकाश देशपांडे
rat27p12.jpg
L24752
ः कृष्णजी केशव दामले तथा केशवसुत.
....
केशवसुतांच्या कवितेतून नव्या युगाची ओळख
मराठी कवितेला आधुनिक वळण देणारे कवी केशवसुत! केशवसुतांचा जन्म ७ ऑक्टोबर १८६६ रोजी मालगुंड येथे झाला. कविता ही परमेश्वराची आराधना करण्यासाठी लिहावी. ''कांहीतरी तराया गावे'' भवसागरातून तरून जायचे असेल तर भक्तीरसपूर्ण कविता लिहावी, असं संत आणि पंत कवी म्हणत. सभोवती दिसणारे दारिद्य्र, विषमता हा कर्मभोग मानवा, या विचारातून बाहेर पडून
जुने जाऊ द्या मरणालागुनी,
जाळूनि केंव्हा पुरूनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
हा क्रांतदर्शी विचार सांगून कवितेला नव्या युगाची ओळख करून दिली ती केशवसुतांनी.
केशवसुतांचे वडील मराठी शाळेत शिक्षक होते. केशवसुतांचे आजोळ चिपळूण तालुक्यातील मालदोलीच्या करंदीकरांकडे. ज्येष्ठ बंधू श्रीधरपंत हे बडोदा कॉलेजात प्राध्यापक होते. त्यांचे अकाली निधन झाले. कनिष्ठ बंधू मोरोपंत आणि सीतारामपंत प्राध्यापक होते. मो. के. दामले यांनी ''शास्त्रीय मराठी व्याकरण'' हा एक हजार पृष्ठांचा ग्रंथ लिहिला. सीतारामपंत हे कादंबरीकार होते.
केशवसुतांचे मराठी शिक्षण खेडला झाले. लहानपणीच १८८० ला त्यांचा विवाह चिपळूण येथील चितळे यांच्या कन्येशी झाला होता. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मुंबर्इला गेले. मुंबर्इत प्लेगची साथ आल्याने खानदेशात गेले. खानदेशातील फैजपूर येथून धारवाडला हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले. काही कामासाठी हुबळीला गेले असता, प्लेग होऊन ७ नोव्हेंबर १९०५ ला निधन पावले. केशवसुतांना उणेपुरे ३९ वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांचा स्वभाव संकोची आणि मितभाषी होता. सर्वसामान्यांपासून दूर; पण काव्यविश्वात मात्र रमणारे होते. त्यांना रेव्हरंड नारायण वामन टिळक़, माधवानुज, विनायक, हरी नारायण आपटे साहित्यिक असे मित्र होते. केशवसुतांनी प्रारंभीच्या काळात ''कुणीतरी'', ''जगन्मित्र'', ''एक मित्र'' या नावाने कविता लिहिल्या व पुढे काव्यरत्नाकारांनी त्यांना केशवसुत हे नाव दिले आणि ते नाव पुढे प्रसिद्ध झाले. १८८५ ते १९०५ अशा वीस वर्षाच्या काळात केशवसुतांनी कविता लेखन केले. १९१७ ला ह. ना. आपटे यांनी केशवसुतांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. या संग्रहात १२४ कविता होत्या. पुढे आणखी सहा कविता मिळाल्या व १३१ कविता असलेला काव्यसंग्रह त्यांचे कनिष्ठ बंधू सी. के. दामले यांनी प्रकाशित केला.
आधुनिक मराठीचे प्रवाह केशसुतांच्या कवितेपासून सुरू झाले.
प्राप्तकाळ हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयार खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसूनी का वाढविता मेदाऋ
विक्रम काही करा, चल तर
असा विचार सांगताना
ब्राह्मण नाही, हिंदूही नाही
न मी एक पंथाचा
तेच पतित की, जे आखाडती
प्रदेश साकल्याचा
हा समतेचा संदेश देतात.
''देवळी त्या देवास बळे आणा
परि राही तो सृष्टिमधे राणा!''
परमेश्वर स्थिरचर व्यापून दशांगुळे उरलाय, हा विचार कवितेतून मांडतात. केशवसुतांनी दिलेल्या प्रेरणेतून गोविंदाग्रजांची ''दसरा'' बी कवींची ''डंका'' या कविता निर्माण झाल्या. ''हरपले श्रेय'' ही त्यांची अखेरची कविता त्यांनी २५ मे १९०५ रोजी चिपळूण येथे लिहिली. स्वातंत्र्य, बंधुता, समानता ही त्रिसूत्री त्यांनी मराठी कवितेला दिली. केशवसुतांचे जन्मस्थान असलेल्या मालगुंडमधील त्यांचे घर हे आता आधुनिक काव्याचे तीर्थक्षेत्र झाले आहे.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62104 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..