रत्नागिरी- असे राहिले पतितपावन उभे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- असे राहिले पतितपावन उभे
रत्नागिरी- असे राहिले पतितपावन उभे

रत्नागिरी- असे राहिले पतितपावन उभे

sakal_logo
By

-rat27p11.jpg
L24750
- रत्नागिरी : येथील ऐतिहासिक पतितपावन मंदिर.
--------------
लोगो-- वीर सावरकर जयंती विशेष
...
सर्व हिंदूंना गाभाऱ्यात प्रवेश देणारे पतितपावन

भारतातील पहिले; सावरकर यांना भागोजी शेठ यांनी दिली परवानगी, उपक्रमांची दखल परदेशातही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : सर्व हिंदूंना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश देण्यासाठी स्वतंत्र मंदिरच निर्माण करणं आवश्यक असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निदर्शनास आले. त्यावर त्यानी दानशूर व्यक्तिमत्व श्रीमान भागोजीशेठ कीर याना विनंती केली की, हिंदू समाजात अनेक लोक सामाजिक बंधनांमुळे व गरिबीमुळे स्वतः मंदिर उभारू शकत नाहीत वा मंदिरात जाऊन ईश्वरपूजा करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपण काही करावे. त्यानंतर गाडीतळ भागात पतितपावन मंदिराची उभारणी झाली, अशी माहिती अॅड. बाबासाहेब परुळेकर यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला परुळेकर यांची भेट घेतली असता, ते म्हणाले, सावरकरांनी रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरामध्ये सर्व हिंदूंना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले. मंदिराच्या सभामंडपात सर्व समाजाला घेऊन जाण्यात सावरकर यशस्वी ठरले, परंतु त्यावेळी सावरकरांना हिंदू समाजातील एका घटकाकडून विरोध झाला. आपल्या उद्दिष्टांसाठी स्वतंत्र मंदिरच निर्माण करणं, हा त्यावर योग्य उपाय आहे, असे सावरकरांच्या निदर्शनास आले. त्यादरम्यान दानशूर व्यक्तीमत्व श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी वीर सावरकरांना महाशिवरात्र उत्सवात बोलावले. कीरशेठनी किल्ला भागात भागेश्वराचे मंदिर बांधले व पूजा, उत्सव साजरे करत होते. या मंदिराच्या निर्मितीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी वास्तव्यातील एका महत्त्वाच्या संकल्पाची सिद्धी झाली. कीर शेठजींनी वीर सावरकरांची विनंती ताबडतोब मान्य केली व रत्नागिरीमध्ये सर्व हिंदूंना मंदिरात जाऊन पूजा करण्याची मुभा असणारे मंदिर स्वतः उभारून देण्याचे आश्वासन दिले. यातूनच पतितपावन मंदिराच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यानंतर रत्नागिरी शहरामध्ये शेवडे यांची जागा विकत घेण्यात आली व त्या ठिकाणी कीर शेटजीनी आपल्या पैशांनी एका आकर्षक आणि नक्षीदार अशा मंदिराची निर्मिती केली.
फाल्गुन शुद्ध पंचमीला या मंदिराचा कलशारोहण सोहळा श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या हस्ते थाटात झाला.
..
चौकट
सामाजिक समरसतेचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र..
दरम्यान, या मंदिरामुळे हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन व परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार मिळाला. असा अधिकार दिलेले हे भारतातले पहिले मंदिर आहे, म्हणूनच ते सामाजिक समरसतेचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.
--------------------
चौकट 1
अनेकविध उपक्रमांनी सामाजिक समरसता
सावरकरांनी जातिभेद निर्मूलन अभियान आणि हिंदू समाजातील सात अनिष्ट रूढी विरूध्द दिलेला लढा पूर्णपणे परिणामकारक ठरला. यासाठी सावरकरांनी लेख व व्याख्याने, सहभोजने, सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ, मेळे अणि अखिल हिंदू गणेशोत्सव आयोजन, विविध वाड्यावर जाऊन केलेली भजने व कीर्तने, शहरामध्ये सर्व लोकांच्या घरी जाऊन दसऱ्याला सोने वाटणे व इतर उपक्रम यामुळे हिंदू संघटनाला गतीमानता आली. या कार्यक्रमांची दखल देशासह लंडन येथील वृत्तपत्रे व पार्लमेंट हाऊसने देखील घेतली, असे अॅड. परुळेकर यांनी सांगितले.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62108 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top