हिवाळे-खालचीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळे-खालचीवाडी
रस्ता कामाचा शुभारंभ
हिवाळे-खालचीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ

हिवाळे-खालचीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ

sakal_logo
By

24783
मालवण ः हिवाळे-खालचीवाडी रस्ता कामाचा प्रारंभ करताना ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब.


हिवाळे-खालचीवाडीत रस्त्याचे काम

ग्रामस्थ समाधानी, डोंगरी विकास अंतर्गत १० लाखाचा निधी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखांचा निधी जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी मंजूर करून घेतला. या रस्ता कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले.
अनेक वर्षाची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे. रस्ता नादुरुस्त झाल्याने वाहतुकीस अडथळाही निर्माण होत होता. ही समस्या लक्षात घेत माजी बांधकाम सभापती चव्हाण यांनी यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देवून तो पूर्ण केला. माजी सरपंच विश्वास परब, विश्वनाथ परब यांनी याबाबत पाठपुरवा केला.
रस्ता भूमीपूजन प्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत पवार, रघुनाथ धुरी, उपसरपंच काशिनाथ हिवाळेकर, सोसायटी संचालक काका गावडे, रामचंद्र पवार, जितेंद्र परब, दिपक परब, प्रकाश परब, मंगेश परब, बाळा परब, शंकर धुरी, जयवंत परब, गुणाजी परब, प्रशांत परब, हरिश्चंद्र परब, सुनिल परब, तुकाराम परब, विवेक परब, सुर्यकांत परब, बबन परब, आप्पा परब, बाबाजी परब, अर्जुन परब, दिगंबर परब, गोपाळ परब, तन्मय परब, राजेश परब, अविनाश परब, ओम परब, जयेश परब, पकंज परब, शिवराम परब, शत्रुघ्न परब, सुजल परब यासह अन्य उपस्थित होते. रस्ताकाम सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62136 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top