आंबा नुकसानीची भरपाई द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा नुकसानीची भरपाई द्या
आंबा नुकसानीची भरपाई द्या

आंबा नुकसानीची भरपाई द्या

sakal_logo
By

24792
देवगड : तहसीलदार मारुती कांबळे यांना निवेदन देताना बागायतदार.

आंबा नुकसानीची भरपाई द्या

देवगडच्या बागायतदारांची मागणी; तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ : आंबा फळपिक विमा संरक्षण अंतर्गत नुकसानी मिळावी, या मागणीसाठी तालुक्यातील आंबा बागायतदारांनी येथील तहसीलदार मारुती कांबळे यांना निवेदन दिले. भरपाईच्या अनुषंगाने बागायतदारांनी तहसीलदार मारुती कांबळे यांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. यावेळी विलास रुमडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, १ ते ५ डिसेंबर २०२१ व २१ ते २३ जानेवारी या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनुक्रमे ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर-जानेवारी या कालावधीत आलेला मोहोर पूर्णपणे गळून गेला व काळा पडला. मोहोर वाचविण्यासाठी बागायतदारांनी महागडी किटकनाशके घेऊन त्या कालावधीत सुमारे ६-७ फवारण्या केल्या. त्या फुकट जावून बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरीही काही बागायतदारांनी फळे टिकविण्यासाठी यश प्राप्त केले; परंतु डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रचंड थंडी व मार्च एप्रिलपर्यंत ३७ अंशापेक्षा अधिकचे तापमान नंतर १० व २४ एप्रिल २०२२ पर्यंत पडलेला अवकाळी पाऊस व जोरदार वारा यामुळे आंबा कोसळून अतोनात नुकसान झाले. त्यात फळमाशीचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्यामुळे तयार झालेला आंबा बऱ्याच प्रमाणात खराब झाला. वाशी बाजारात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाल्यामुळे दरात घसरण झाली. त्यामुळे बागायतदारांना कवडीमोल भावाने आंबा कॅनिंगला देणे भाग पडले. त्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे, यावर्षीचे पीक कर्ज व त्याचे व्याज भरणे कठीण झाले आहे. या वास्तव परिस्थितीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून सर्व बागायतदारांना नुकसान भरपाई किंवा सरसकट कर्ज माफी द्यावी.
----
निकषांमध्ये सुधारणा गरजेची
बागायतदारांना पीक संरक्षण मिळावे यासाठी शासनमान्य विमा कंपन्यांकडून पीक विमा काढला जातो. बागायतदारांना हवामानावर आधारित निकषांप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते; परंतु विमा कंपन्यांनी जाहीर केलेले निकष हे बागायतदारांच्या फायद्याचे नाहीत. त्यामुळे त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे आवश्यक आहे. त्या संदर्भात पीक विम्याचा कालावधी १ ऑक्टोबर ते ६ जून करावा. त्याचप्रमाणे वास्तव परिस्थितीनुसार विमा कंपन्याना १०० टक्के नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62148 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top