खेड ः खेडमध्ये प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः खेडमध्ये प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड
खेड ः खेडमध्ये प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड

खेड ः खेडमध्ये प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड

sakal_logo
By

खेडमध्ये प्लास्टिकबंदीचे उल्लंघन
केल्यास दंडः मुख्याधिकारी ढोरजकर
खेड, ता. २७ ः खेड नगर पालिकेने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविधांगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. या पाठोपाठ दोनच दिवसांपूर्वी नगर पालिकेने प्लास्टिक पिशवी बंदी रॅली काढून प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून, तरतुदीतील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिली.
नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अधिक गतिमान केले आहे. या अभियानांतर्गत यापूर्वीही प्लास्टिक पिशव्या बंदीविरोधात धडक मोहीम उघडण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत तब्बल १८ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. नगर पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. काही व्यावसायिक लपूनछपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने सिंगल युज प्लास्टिक वस्तूसह ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. याशिवाय ३१ डिसेंबरपासून१२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरदेखील बंदी घालण्यात येणार आहे. शहरातील सर्व नागरिकांसह व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62206 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top