
रत्नागिरी ः जिल्ह्यात 4 नवीन कोरोनाबाधित
कोरोना चित्र वापरा
..
कोरोनामुक्त जिल्ह्यात सापडले बाधित!
चारही रूग्ण रत्नागिरी तालुक्यातील; ९ सक्रीय रूग्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्ह्यात नुकतेच ४ नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. अनेक दिवस शून्यावर असलेला बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. या बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. चारही बाधित रत्नागिरी तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अनेक दिवसांपासून बाधितांची संख्या शुन्यावर असल्याने जिल्हा कोरोनामुक्त होता; मात्र आज आरोग्य विभागाने केलेल्या सुमारे २०० चाचण्यांमध्ये ४ कोरोनाबाधित सापडले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील हे बाधित आहेत. त्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल बाधित आले. एक बाधित खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची चाचणीही बाधित आली आहे. त्यामुळे आजवरची बाधितांची संख्या ८४ हजार ४९९ एवढी झाली आहे. तर दिवसभरात एकच बाधित बरा झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार ९६५ असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६. ९९ आहे. दिवसभरात एकाचाही कोरोनाने मृत्यू झाला नसला तरी आजवर २ हजार ५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ३ टक्के आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ आहे. त्यामध्ये ८ जण गृहविलगीकरणात तर १ संस्थात्मक विलगीकरणात आहे.
....
चौकट
दक्षता बाळगण्याचे आवाहन
राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
..
ग्राफ करावा
एक नजर..
अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याः ९
गृहविलगीकरणातः ८
ःसंस्थात्मक विलगीकरणातः १
..
एक दृष्टिक्षेप...
आजवरची बाधितांची संख्याः ८४ हजार ४९९
बरे झालेल्यांची संख्याः ८१ हजार ९६५
आजवर मृत्यूः २ हजार ५३४
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62225 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..